एक्स्प्लोर

Share Market: शेअर बाजारात आज तेजी, Sensex 600 अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांनी कमावले 19,000 कोटी 

Stock Market Updates: शेअर बाजारात आज आयटी, एफएमसीजी आणि मेटल इंडेक्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. 

मुंबई: शेअर बाजारात आज तेजी दिसून आली असून त्यामुळे गुंतवणूकदारांनी चांगलीच कमाई केली आहे. आज बाजार बंद होताना (Share Market Closing Bell) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज 158 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.99 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,032 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 0.89 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,929 अंकांवर स्थिरावला. शेअर बाजारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी 19 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे.

आज बाजार बंद होताना एकूण 1252 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 2158 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज एकून 114 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.  

आज बाजार बंद होताना UPL, ITC, Reliance Industries, Adani Ports आणि Adani Enterprises यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तरत  Eicher Motors, Apollo Hospitals, SBI Life Insurance, Grasim Industries आणि BPCL कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली. 

आज शेअर बाजार बंद होताना उर्जा  आणि रिअॅलिटीच्या इंडेक्समध्ये एक टक्क्यांची घट झाली. तर आयटी, एफएमसीजी आणि मेटल इंडेक्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 0.4 टक्के तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.6 टक्क्यांची घट झाली.

Share Market Closing Bell: गुंतवणूकदारांना 19 हजार कोटी रुपयांचा फायदा

शेअर बाजारातील आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी 19,000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड कंपनींच्या एकूण भांडवलात वाढ होऊन ते 265.95 लाख कोटी रुपये इतकं झालं आहे. सोमवारी हे भांडवल 265.76 लाख कोटी रुपये इतकं होतं. त्यामुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या भांडवलात एकूण 19 हजार कोटींची भर पडली आहे.  

शेअर बाजाराची सुरुवात तेजीने

आज शेअर बाजाराच्या सुरुवातीला बीएसई (BSE) सेन्सेक्स 118.41 अंकांनी म्हणजे 0.20 टक्क्यांच्या वाढीनंतर 60,550 वर उघडला. याशिवाय, एनएसई (NSE) चा निफ्टी 69.45 अंकांनी म्हणजेच 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 17,840 वर व्यवहार करत होता. बाजारात सकाळी असलेली तेजी बाजार बंद होईपर्यंत कायम राहिल्याने सेन्सेक्समध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. 

या शेअर्समध्ये वाढ 

  • UPL- 3.79 टक्के
  • ITC- 3.27 टक्के
  • Reliance- 2.36 टक्के
  • Adani Ports- 2.06 टक्के
  • Adani Enterpris- 1.87 टक्के

या शेअर्समध्ये घट

  • Eicher Motors- 2.37 टक्के
  • Apollo Hospital- 2.06 टक्के
  • SBI Life Insura- 1.48 टक्के
  • BPCL- 1.12 टक्के
  • Grasim- 1.08 टक्के

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

Embed widget