महिना फक्त 3000 हजारांची गुंतवणूक करा, कोट्यवधी रुपयांचे मालक व्हा, नेमकी काय आहे योजना?
तुम्हाला जर शेअर्समधील गुंतवणूक टाळायची असेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. दीर्घ मुदतीसाठी पैसा उभारण्यासाठी पद्धतशीर गुंतवणूक योजना हा एक चांगला पर्याय आहे.

SIP Investment : शेअर बाजार हा गुंतवणुकीसाठी (Investment) चांगला मार्ग आहे. मात्र, शेअर्समधील चढ-उतारांमुळे कधी फटका बसतो तर कधी चांगला फायदा देखील होतो. अशातच तुम्हाला जर शेअर्समधील गुंतवणूक टाळायची असेल, तर तुम्ही पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. दीर्घ मुदतीसाठी पैसा उभारण्यासाठी पद्धतशीर गुंतवणूक योजना हा एक चांगला पर्याय आहे.
ज्यांना शेअर बाजारातील चढ-उताराचा परिणाम न होता दरमहा ठराविक रक्कम गुंतवायची आहे, त्यांच्यासाठी पद्धतशीर गुंतवणूक योजना हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा केवळ कमाईचा पर्याय नाही तर तो तुमच्या भविष्यासाठी नियमित उत्पन्नाचा स्रोत देखील बनू शकतो. तुमचे वय 25 वर्षे असल्यास तुम्ही तुमच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये 3000 प्रति महिना गुंतवणे सुरू करू शकता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पुढील 35 वर्षांनी जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल, तेव्हा तुम्ही केवळ गुंतवणूकच करत नसाल तर सेवानिवृत्तीनंतरचे निश्चित उत्पन्न देखील तयार कराल.
तुम्ही जर वयाच्या 25 व्या वर्षी पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे दरमहा 3000 ची गुंतवणूक सुरु केली. तर तुमच्या पैशाला वाढण्याची पूर्ण संधी मिळते. तुमच्या गुंतवणुकीमध्ये चक्रवाढीचा फायदा होतो. तुमचे निवृत्तीचे वय जवळ आल्यावर तुम्हाला निश्चित उत्पन्नाचा स्रोत देखील होतो. जर तुम्ही दरमहा 3000 रुपयांची गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर 35व्या वर्षी, पाच टक्के वार्षिक वाढीसह, ती 15,760 ची मासिक गुंतवणूक होईल. याचा अर्थ असा की तुमच्या गुंतवणुकीच्या पहिल्या वर्षी तुम्ही SIP मध्ये 36000 ची गुंतवणूक करता तर 35 व्या वर्षी तुम्ही 1.89 लाख गुंतवणूक करता.
35 वर्षात तुम्ही सुमारे तीन कोटी रुपयांचे मालक
12 टक्के सरासरी परताव्याच्या आधारावर विचार केला तर 35 वर्षात तुम्ही 32.51 लाख रुपये गुंतवले आहेत. तुमची गुंतवणूक केलेली रक्कम 2.99 कोटी रुपये झाली आहे. 35 वर्षात तुम्ही सुमारे तीन कोटी रुपयांचे मालक झाला आहात. जर तुम्ही तुमच्या सेवानिवृत्ती निधीमध्ये 3 कोटी रुपये ठेवले, तर दर वर्षी 6 टक्के च्या फिक्स डिपॉझिट दरानेही तुम्हाला दरमहा 1.5 लाख रुपये मिळतील.
म्युच्युअल फंडांची मागणी वाढत आहे
शेअर बाजारात (Share Market) सध्या सुरू असलेल्या तेजीमुळं म्युच्युअल फंडांची मागणी वाढत आहे. विशेषत: एसआयपीद्वारे (SIP) गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे म्युच्युअल फंड एसआयपी खातेधारकांची संख्या विक्रमी उच्च पातळीवर पोहोचली आहे. म्युच्युअल फंड एसआयपी (Mutual Fund SIP) करणाऱ्या लोकांची खाती साडेसात कोटींच्या पुढे गेली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Mutual Fund SIP करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्यानं वाढली, एकूण खाती किती?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
