मोठी बातमी! 'या' देशानं घातली मेढ्यांच्या निर्यातीवर बंदी, नेमकं प्रकरण काय?
ऑस्ट्रेलियाने मेंढ्याच्या निर्यातीवर (export of sheep) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 2028 पासून ऑस्ट्रेलियातून समुद्री मार्गाने मेंढ्याटी निर्यात होणार नाही , असं सरकारनं म्हटलंय.
Sheep Exports: ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं (Australia Govt) मोठा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलियाने मेंढ्याच्या निर्यातीवर (export of sheep) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 2028 पासून ऑस्ट्रेलियातून समुद्री मार्गाने मेंढ्याटी निर्यात होणार नाही , असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. तसेच 2028 सालापासून दारूबंदी लागू करण्याची घोषणा देखील ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं केली आहे. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय?
अनेक लोकांचा रोजगार जाण्याची शक्यता
प्राण्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या गटांच्या मागणीवरुन ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. सरकारचे म्हणणे आहे की निर्यात बंद होण्यापूर्वी, 107 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची मदत पाच वर्षांमध्ये दिली जाईल. जेणेकरुन यामुळे प्रभावित झालेल्यांना काही प्रमामात दिलासा मिळेल. मात्र, पशुपालकांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना या निर्णयावर खूश नाही. कारण, यामुळं अनेक लोकांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील आणि शेतकरी समुदायाला याचा फटका बसेल.
मे 2028 पासून मेंढ्यांची निर्यात होणार नाही
ऑस्ट्रेलियन सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, मे 2028 पासून देशातून समुद्रमार्गे जिवंत मेंढ्यांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. फेडरल संसदेच्या चालू टर्ममध्ये बंदी लागू करण्यासाठी कायदा सादर केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, 1990 आणि 2000 च्या दशकात ऑस्ट्रेलिया दरवर्षी 5 दशलक्ष मेंढ्यांची निर्यात करत होता. हळूहळू ही संख्या कमी होत गेली. मेंढ्याची मोठ्या जहाजाद्वारे निर्यात केली जाते. मात्र, पशु हक्काचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी यला विरोध केलाय. मेंढ्यांना इतका लांबचा प्रवास करणे योग्य नाही. 2018 मध्ये तब्बल 2400 मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हे प्रकरण खूप चर्चेत आले होते.
महत्वाच्या बातम्या: