एक्स्प्लोर

पैसे घेऊन राहा तयार! शार्क टँकच्या जज नमिता थापर यांच्या वडिलांच्या कंपनीचा येणार IPO

शार्क टँकमधील जज नमिता थापर यांच्या वडिलांच्या कंपनीचा आयपीओ लवकरच येणार आहे. सेबीने या कंपनीच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची चांगली संधी आहे.

Emcure Pharma IPO : सध्या शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे शेअर बाजारात सूचिबद्ध होणाऱ्या कंपन्यांची संख्याही वाढत आहे. असे असतानाच आता शेयर बाजार नियामक संस्था सेबीने (SEBI) शार्क टँक इंडिया (Shark Tank India) फेम नमिता थापर (Namita Thapar) यांच्या वडिल्यांच्या मालकीच्या असलेल्या एमक्यअर फार्मा (Emcure Pharma) या कंपनीच्या आयोपीओला मंजुरी दिली आहे. ही कंपनी आपल्या आयोपीओत नव्या शेअर्ससह ऑफर फॉर सेलच्या (Offer For sale) माध्यमातूनही निधी उभा करणार आहे. ही कंपनी आयपीओच्या फ्रेश इक्विटीने 800 कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कंपनीचे प्रमोटर्स आणि शेअरहोल्डर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून 1.36 कोटी शेअर्स विकणार आहेत.   

दोन महिन्यांत येऊ शकतो आयपीओ

सेबीने एमक्युअर फार्मा (Emcure Pharma) या कंपनीच्या आयपीओला मान्यता दिली आहे. या मंजुरीनंतर आगामी दोन महिन्यांत या कंपनीचा आयपीओ प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो. कंपनीने डिसेंबर 2023 मध्ये आयपीओ आणण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी करत ड्रॉफ्ट पेपर दाखल केले होते. दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार आयपीओतून आलेल्या पैशांतून कंपनी आपले कर्ज फेडणार आहे. तसेच उर्वरित रक्कम उद्योगात गुंतवणार आहे. 2022 साली युक्रेन-रशिया युद्धामुळे शेअर बाजारात मोठी पडझड झाली. त्यामुळे एमक्यूअर फार्माने आपली आयपीओ आणण्याची योजना पुढे ढकलली होती. 

500 वैज्ञानिक, 11 हजार कर्मचारी

एमक्युअर फार्मा या कंपनीने जेपी मॉर्गन, जेफ्फीरीज, कोटक या बँकेला इन्व्हेस्टमेंट बँक म्हणून नियुक्त केलं आहे. शार्क टँकच्या जज नमिता थापर यांचे वडील सतीश मेहता यांनी 1981 मध्ये फक्त तीन लाख रुपयांच्या भांडवलात एमक्योअर फार्मा ही कंपनी उभी केली होती. फार्मा क्षेत्रातील ही सर्वांत मोठी 13 वी कंपनी आहे.  गेल्या 40 वर्षांत या कंपन्यांनी 19 उपकंपन्या उभ्या केल्या आहेत. या कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीममध्ये एकूण 500 वैज्ञानिक आहेत. या कंपनीत एकूण 11,000 कर्मचारी काम करतात.

हेही वाचा :

अब्जाधीश मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी करायच्या 'ही' नोकरी; पगाराची रक्कम वाचून व्हाल थक्क!

बँक एफडीवर असतो धोका? जाणून घ्या फिक्स्ड डिपॉझिटच्या माहीत नसलेल्या 'या' गोष्टी

एका दिवसात शेअर वाढला अन् झाला चमत्कार, अॅपल, मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'ही' कंपनी ठरली सर्वांत मोठी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kolhapur dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
Karad North Assembly Election 2024 : बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार
शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Deshmukh : गडकरींच्या गावात भाजपची हवा;आशिष देशमुखांच्या रॅलीत लोकांचा उत्साहCM Shinde Speech Chatrapati Sambhajinagar | मोदींसाठी शायरी, 23 तारखेला मोठे फटाके फोडायचे- शिंदेABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 3 PM : 14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAaditya Thackeray Speech Dapoli | राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम महायुतीने केलं-आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kolhapur dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
Karad North Assembly Election 2024 : बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार
शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
Mallikarjun Kharge : नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
Embed widget