(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market : शेअर बाजारात तेजीचे संकेत; सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला
Share Market Updates : शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली.
Share Market Updates : मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजीचे संकेत मिळत आहेत. आज शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्सने 58900 अंकाचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीने सुरुवातीच्या टप्प्यात 17600 अंकाचा टप्पा ओलांडला आहे.
शेअर बाजारात आज चांगली उसळण दिसून आली. निफ्टीमध्ये 69.60 अंकानी वधारून 17599.90 अंकावर सुरू झाला. तर, सेन्सेक्स 334.37 अंकानी वधारून 58,910.74 अंकावर सुरू झाला. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर 15 मिनिटात सकाळी 9.30 वाजता निफ्टी 116.10 अंकानी वधारला. सकाळी 10.25 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 47 अंकानी तर, निफ्टी 11 अंकानी वधारला होता.
निफ्टी 50 मधील 46 शेअर्स वधारले आहेत. तर, फक्त चार शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. बँक निफ्टीमध्ये 151.10 अंकानी वधारला आहे. त्यानंतर 37898 अंकाच्या पातळीवर व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. आज सुरुवातीच्या ट्रेडमध्ये निफ्टीने 17651 अंकाचा टप्पा गाठला होता.
जेएसडब्लू स्टीलचा शेअर दर 2.65 टक्क्यांनी वधारला आहे. तर, ओएनजीसीमध्ये 2.52 टक्क्यांनी तेजी दिसून आली. अपोलो रुग्णालयाच्या शेअर दरात दोन टक्क्यांनी उसळण घेतली आहे. युपीएलमध्ये 1.72 टक्क्यांची तेजी दिसत आहे. टाटा स्टीलमध्ये 1.67 टक्क्यांनी वधारला.
तर, डॉ. रेड्डीज लॅबच्या शेअर दरात 1.39 टक्क्यांनी घसरण झाली. एशियन पेंट्सच्या शेअर दरात 0.49 टक्क्यांनी घसरला. टायटनच्या शेअर दरात 0.19 टक्क्यांनी घसरण झाली. तर, सिप्लामध्ये 0.05 टक्क्यांची किंचीत घट झाली.
दरम्यान, मंगळवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 388 अंकांनी तर निफ्टीही 144 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये 0.66 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,576 वर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये 0.82 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,530 वर पोहचला होता. मंगळवारी 1146 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर, 2193 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 90 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.