Share Market Opening : आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजार संमिश्र सुरुवात; सेन्सेक्समध्ये किंचित तेजी, निफ्टी गडगडला
Share Market Opening : आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजार संमिश्र सुरुवात झाली आहे. सेन्सेक्समध्ये किंचित तेजी असून निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहे.
![Share Market Opening : आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजार संमिश्र सुरुवात; सेन्सेक्समध्ये किंचित तेजी, निफ्टी गडगडला share market updates sensex nifty bse nse stock market opening today Share Market Opening : आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजार संमिश्र सुरुवात; सेन्सेक्समध्ये किंचित तेजी, निफ्टी गडगडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/f60f583713afbdd209a876582d81bf2b1673951844564314_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Share Market Opening Bell : आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजारात (Stock Market) संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. देशांतर्गत शेअर बाजारात आज संमिश्र व्यवसाय पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये (Sensex) सुरुवातीला थोडी वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे निफ्टीची (Nifty 50) सुरुवात थोड्या घसरणीने झाली आहे. देशांतर्गत शेअर बाजाराला जागतिक बाजारातून चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने भारतीय शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळत आहे.
सुरुवातीला बाजारातील परिस्थिती काय?
आज बाजार उघडल्यानंतर लगेचच सेन्सेक्स 192.7 अंकांच्या घसरणीनंतर 60,649.18 वर आला होता. याशिवाय निफ्टी 17,790 वर आला असून तो 64.05 अंकांच्या घसरणीने व्यवहार करत आहे.
प्री-ओपनिंगमध्ये बाजारातील परिस्थिती
प्री-ओपनिंगमधील शेअर बाजाराची परिस्थिती पहिली तर, NSE चा निफ्टी 7.40 अंकांच्या वाढीसह 17861 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. याशिवाय बीएसईचा सेन्सेक्स 36.36 अंकांच्या म्हणजेच 0.06 टक्क्यांच्या वाढीसह 60878 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
Markets open with losses, tracking weak global trends
— ANI Digital (@ani_digital) February 6, 2023
Read @ANI Story | https://t.co/SIz3RSMHZo#Sensex #Decline #OpeningTrade #Nifty #Drop #BSE pic.twitter.com/3VbacVw4r9
आयटी आणि मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये घसरण
शेअर बाजारात आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एमपीसी बैठकही सोमवारपासून सुरू होणार आहे. यापूर्वी डिसेंबरच्या चलनविषयक धोरण आढाव्यात, मध्यवर्ती बँकेने प्रमुख धोरण दर म्हणजे रेपो दर 0.35 टक्क्यांनी
ने वाढवले होते.
शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी व्यवहाराला घसरणीसह सुरूवात झाली. सध्या सेन्सेक्स 159.11 अंकांच्या घसरणीसह 60682.77 अंकांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, निफ्टी 58.65 अंकांच्या घसरणीसह 17795.40 अंकांवर व्यवहार करत आहे. आज निफ्टी 17812 च्या अंकांवर तर सेन्सेक्स 60350 अंकांवर उघडला.
'हे' शेअर्स तेजीत
आज शेअर बाजारात बँकांचे शेअर्स तेजीत आहेत. ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, आयटीसी, अदानी पोर्ट हे शेअर्स तेजील व्यवहार करताना दिसत आहेत.
या शेअर्समध्ये घसरण
आज शेअर बाजारात आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअर्स मोठ्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. एचडीएफसी लाईफ, टाटा स्टील, डीवीस्लॅब या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तसेच अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणही सुरुच आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
RBI On Adani Group : अदानी समूहाला देण्यात आलेल्या कर्जावर RBI ने दिली महत्त्वाची माहिती, म्हटलं की...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)