एक्स्प्लोर

Share Market : ट्रम्प टॅरिफच्या दणक्यानंतर शेअर बाजार सावरला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये दिलासादायक चित्र, प्रमुख कारणं....

Share Market : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प टॅरिफमुळं जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली होती. कालच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आशादायी चित्र पाहायला मिळत आहे.  निफ्टी 50 निर्देशांकात 374 अंकांची तर सेन्सेकमध्ये 1089 अंकांची वाढ झाली. जागतिक बाजारातील तेजी आणि ट्रेड वॉरचा भारतावर होणारा परिणाम तुलनात्मक दृष्ट्‍या कमी असल्यानं शेअर बाजार सावरला. निफ्टीचे 13 प्रमुख विभागीय निर्देशांक देखील तेजीमध्ये दिसून आले. सर्वाधिक तेजी टायटन, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये दिसून आली. शेअर बाजारातील आजचं कामकाज संपलं तेव्हा निफ्टी 50 निर्देशांक 374.25 अंकांच्या तेजीसह 22535.85 वर बंद झाला. तर, सेन्सेक्स 1089.18 अंकांच्या वाढीसह 74227.08 पर्यंत पोहोचला.  

शेअर बाजारातील तेजीची प्रमुख कारणं 

जागतिक बाजार सावरला

आशियाई बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. यामुळं भारतीय शेअरला चांगला सपोर्ट मिळाला. जपानचा नक्केई 225 निर्देशांक 5.5 टक्क्यांनी वाढला. चीनचा शाघांई कम्पोझिट 1 टक्क्यांनी वधारला. डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ संदर्भातील धोरण येत्या काळात बदलू शकतात, अशी आशा गुंतवणूकदारांना आहे. सोमवारी रात्री अमेरिकन बाजारात संमिश्र चित्र पाहायला मिळालं होतं. नॅस्डॅक कम्पोझिट निर्देशांक 0.10 टक्क्यांनी वाढला. एस अँड पी 500  आणि डॉव जोन्समध्ये घसरण पाहायला मिळाली.   


2. अमेरिका-चीनमधील तणाव मोठं संकट नाही, अशी धारणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला धमकी दिली आहे. चीननं अमेरिकेवर लादलेलं टॅरिफ मागं घेतलं नाही तर अतिरिक्त 50 टक्क टॅरिफ लादू असं ट्रम्प म्हणाले. चीननं माघार न घेतल्यास त्यांच्यावर अमेरिकेकडून एकूण 104 टक्के टॅरिफ लादलं जाईल. चीननं अमेरिकेपुढं न झुकता अमेरिकेवर पलटवार केला आहे. अखेरपर्यंत लढू, अशी भूमिका चीननं घेतली आहे. यूरोपियन यूनियन, जपान यांनी अमेरिकेसोबत चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे. भारताची देखील अमेरिकेसोबत चर्चा सुरु आहे.  जिओजीत फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वीके. विजयकुमार यांच्या मते व्यापार युद्ध अमेरिका-चीन यांच्यामध्ये सुरु राहील. अमेरिकेत मंदीचं संकट वाढलं आहे. चीनवर टॅरिफचा सर्वाधिक परिणाम होईल. चीनवर अमेरिकेनं 104 टक्के टॅरिफ लादल्यास निर्यातीवर परिणाम होऊ शकतो.  

3. भारताची अर्थव्यवस्था मजबूत

तज्ज्ञांच्या मतानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून जागतिक अस्थिरतेच्या काळात  भारतीय शेअर बाजाराला मजबुती देतो. आर्थिक वर्ष 2024-25 च्या आर्थिक सर्व्हेमध्ये भारताचा जीडीपी 6.3 टक्के ते 6.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वीके. विजयकुमार यांच्या मते, भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे, वाढीच्या अनेक शक्यता आहे.  लार्ज कँप कंपन्यांचं मूल्यांकन अजूनही आकर्षक असून विदेशी गुंतवणूकदारांची यावर नजर राहू शकते.  जिओजित इनवेस्टमेंट्स चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स  यांच्यामतानुसार निफ्टीनं  22165 चा टप्पा गाठला आहे. पुढचा टप्पा 22522 आहे. दरम्यान तो देखील टप्पा बाजारानं पार केला आहे. 

 
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Embed widget