एक्स्प्लोर

Bajaj Housing IPO: बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओनं इतिहास रचला, टाटांच्या कंपनीचा रेकॉर्ड मोडला, गुंतवणूकदारांकडून विक्रमी बोली 

Bajaj Housing Finance IPO: बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. आयपीओ सबस्क्राईब करण्याचा काल शेवटचा दिवस होता.  

मुंबई : बजाज उद्योग समुहाच्या बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी जोरदार उत्साह दाखवला. तीन दिवसात गुंतवणूकदारांनी विक्रमी बोली लावली. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओनं शेअर बाजारातील आयपीओचे सर्व विक्रम मोडले. टाटा उद्योग समुहाच्या टाटा टेक्नोलॉजीच्याच्या आयपीओच्या नावावर असलेला सर्वाधिक बोलीचा विक्रम आता बजाज हाऊसिंग फायनान्सच्या नावावर झाला आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओवर तीन दिवसात साडे चार लाख कोटी रुपयांची बोली लागली. टाटा टेक्नोलॉजीच्या नावावर यापूर्वी हा विक्रम होता. त्यांच्या आयपीओवर 1.5 लाख कोटी रुपयांची बोली लागली होती. 
 
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या व्यवस्थापनानं आयपीओद्वारे 6560 कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न केला होता. या आयपीओद्वारे 3560 कोटींचे नवे शेअर इशू करण्यात आले आहेत. तर, 3 हजार कोटी रुपयांची ऑफर सेल करण्यात आली होती. चित्तोडगढ डॉट कॉमच्या आकडेवारीनुसार बुधवारी बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ 67.43 पट सबस्क्राईब झालं आहे. म्हणजेच 6560 कोटी रुपयांच्या इशूसाठी गुंतवणूकदारांनी 4.42 लाख कोटी रुपयांची बोली लावली आहे.  

क्वालिफायईड  इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदार म्हणजे मान्यताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून देखील विक्रमी बोली लावण्यात आली आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ 9 सप्टेंबरला खुला झाला होता तो 11 सप्टेंबरला बंद झाला. बाजारात या कंपनीच्या शेअरचं लिस्टींग 16 सप्टेंबरला होणार आहे. बजाजतर्फे आयपीओत कंपनीच्या शेअरची किंमत 66-70 रुपये ठेवली होती.  एका लॉटमध्ये 212 शेअर होते. आयपीओवर क्यूआयबी प्रवर्गातील गुंतवणूकदारांनी सर्वाधिक बोली लावली. क्यूआयबी कडून 222.05 पट बोली लावली गेली. तर, एनआयआयनं 43.98 पट बोली लावली, रिटेलर्सननी 7.41 पट आणि कर्मचाऱ्यांनी 2.13 पट तर इतर गुंतवणूकदारांनी 18.54 पट बोली लावली.  

ग्रे मार्केटमध्ये बोलबाला

बजाज हाऊसिंग फायनान्स ही गृहकर्ज देणीर संस्था आहे. ही 2015 पासून नॅशनल हाउसिंग बँकेकडे नोंदणीकृत आहे. आयपीओमध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, बोफा सिक्यूरिटीज, एक्सिस कॅपिटल, गोल्डमॅन सॅश (इंडिया) सिक्यूरिटीज, एसबीआय कॅपिटल मार्केट्स, जेएम फायनान्शियल आणि आयआयएफएल सिक्यूरिटीजला आयपीओचं बुक रनिंग लीड मॅनेजर केलं गेलं होतं. हा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये 96 टक्के अधिक ट्रेड करत होता.बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओची सोशल मीडियावर देखील चर्चा सुरु आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) 

इतर बातम्या : 

Share Market : कंपनीनं संरक्षण क्षेत्रात पाऊल टाकण्याची घोषणा, शेअर बनला रॉकेट, 15 दिवसात 53 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget