(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening : शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 52600 अंकांवर
Share Market Opening : शेअर बाजारात आजही अस्थिरता असल्याचे संकेत मिळत आहेत.
Share Market Opening : भारतीय शेअर बाजारात आजही अस्थिरता राहण्याचे संकेत दिसत आहेत. शेअर बाजारावर खरेदी आणि विक्रीचा दबाव कायम आहे. बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मात्र, त्यानंतर काही वेळेत बाजार वधारला. त्यानंतर पुन्हा एकदा खरेदी विक्रीचा दबाव असल्याचे दिसून आले.
आज बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली होती. मात्र, त्यानंतर खरेदीचा जोर असल्याचे दिसून आले. निफ्टी निर्देशांक 2.85 अंकांसह घसरणीसह 15729.25 या पातळीवर व्यवहार सुरू झाला. तर, सेन्सेक्समध्ये 43.16 अंक म्हणजे 0.082 टक्क्यांची घसण नोंदवण्यात आली. सेन्सेक्स 52650 अंकांवर व्यवहार करत होता. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 15 अंकांनी वधारत 52,709.23 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 2.60 अंकांनी वधारत 15,734.70 अंकांवर व्यवहार करत होता.
प्री-ओपन सत्रात बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले होते. एनएसईचा निर्देशांक निफ्टी 148.60 अंकांच्या घसरणीसह 15583 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टीतील 50 पैकी 24 शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसून येत होता. तर, 26 शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. बँक निफ्टीत 33.85 अंक म्हणजे जवळपास 0.10 टक्क्यांच्या तेजीसह 33345 अंकांच्या पातळीवर ट्रेडिंग करत होता.
मेटल आणि एफएससीजी सेक्टर वगळता इतर सेक्टरमध्ये खरेदी असल्याने शेअर दर वधारले. जागतिक पातळीवरील हालचालींमुळे मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
निफ्टीमध्ये बजाज फिनसर्व्ह आणि टाटा मोटर्स हे दोन्ही शेअर्स 1.35 टक्क्यांनी वधारले आहेत.
दरम्यान, मंगळवारी शेअर बाजारात काही प्रमाणात अस्थिरता असल्याचं दिसून आले होते. शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 153 अंकानी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 42 अंकांनी घसरला. सेन्सेक्समध्ये 52,693 अंकांवर आणि निफ्टी 15,732 अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजार बंद होताना 1506 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर 1730 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 132 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या: