(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening : शेअर बाजारात विक्रीचा जोर, सेन्सेक्स घसरणीसह उघडला
Share Market Opening : शेअर बाजारात विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स, निफ्टीत घसरण दिसून येत आहे.
Share Market Opening : जागतिक बाजारात दिसत असलेल्या पडझडीच्या दबावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांची घसरणीसह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स 92 अंकांच्या घसरणीसह 55,676 अंकाच्या पातळीवर सुरू झाला. त्याशिवाय, निफ्टी निर्देशांकात 16.85 अंकाची घसरण दिसून आली.
आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात SGX Nifty मध्ये जवळपास 100 अंकांची घसरण दिसून येत होती. तर, आशियाई शेअर बाजारातही मोठी घसरण असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजार निर्देशांक डाऊ जोन्स 300 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता. तर, नॅस्डॅकमध्येदेखील घसरण दिसून येत आहे.
प्री-ओपनिंग सत्रात बाजारात घसरण दिसून आली. प्री-ओपनिंग सत्रात निफ्टी 16584 च्या पातळीवर व्यवहार दिसत होता. त्याशिवाय, सेन्सेक्स 158.59 अंकांनी घसरून 55,610 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 194 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टीमध्ये 53 अंकांची घसरण दिसून आली.
बँक निफ्टी, ऑटो, वित्तीय सेवा, खासगी बँका आणि आरोग्य क्षेत्रात खरेदी सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर, ग्राहकोपयोगी वस्तू, रिअल्टी, पीएसयू बँक, फार्मा, मेटल, मीडिया, आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रात विक्रीचा जोर आहे.
त्याशिवाय, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अॅक्सिस बँक, सन फार्मा, डॉ. रेड्डी लॅब, इंडसइंड बँक आणि मारुती आदी कंपन्यांच्या शेअर दरात खरेदीचा जोर दिसत आहे.
तर, टेक महिंद्रा, टाटा स्टील, विप्रो, बजाज फिनसर्व, एशियन पेंट्स, एचयूएल, इन्फोसिस, टायटन, टीसीएस, एचसीएल टेक, एसबीआय, रिलायन्स आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: