Share Market : शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 59 हजारांच्या खाली, निफ्टीही घसरला
Share Market Updates : आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्ससह निफ्टीही गडगडला आहे.
Share Market Opening Bell : आज (10 मार्च)आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे. बाजारातील सलग तीन दिवसांच्या तेजीवर गुरुवारी ब्रेक लागला. त्यानंतर आज बाजाराची घसरणीसह सुरुवात झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे. आज सुरुवातीच्या सत्रात शेअर बाजार गडगडला. बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहे.
सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला
आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरणीसह सुरुवात झाली. सुरुवातीलाच सेन्सेक्स 59,000 हजारांच्या खाली घसरला तर, निफ्टीही घसरुन 17500 व्यवहार करताना पाहायला मिळाला. सध्या सेन्सेक्सची घसरण सुरुच असून 800 अंकांनी खाली आला आहे. तसेच निफ्टीमध्ये 1.1 टक्के घसरण झाली असून निफ्टी 17400 वर व्यवहार करत आहे.
सेन्सेक्स 59 हजारांच्या खाली, निफ्टीही घसरला
निफ्टीमध्ये घसरलेल्या शेअर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस, इंडसइंड बँक (IndusInd Bank), बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय (ICICI Bank) बँक हे शेअर्स आघाडीवर आहेत.
आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण
कोफोर्ज (Coforge), LTIMindtree, एल अँड टी (L&T) टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि Mphasis या शेअर्समध्ये 1 टक्क्यांहून जास्त घसरण झाली आहे. Coforge शेअर्स सर्वाधिक तोट्यात असून त्यामध्ये 2.71 टक्क्यांची घसरण झाली आहे
बँक निफ्टी 1.9 टक्क्यांनी गडगडला
बँकिंग स्टॉक इंडेक्स बँक निफ्टी शुक्रवारी सुरुवातीच्या सत्रातील व्यवहारात 1.9 टक्क्यांनी घसरला आहे. निर्देशांकाने वॉल स्ट्रीटच्या बँकिंग शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर भारतातील शेअर बाजारातील बँक निफ्टी 1.9 टक्क्यांनी गडगडला. एचडीएफसी बँक, एसबीआय, बँक ऑफ बडोदा आणि पीएनबी बँकेचे शेअर्स 2.5 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.
'या' शेअर्सची कमाई
टाटा मोटर्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, बजाज ऑटो आणि महिंद्रा अँड महिंद्रा या शेअर्सची तेजीत घोडदौड पाहायला मिळत आहे.
'या' शेअर्समध्ये घसरण
अदानी एंटरप्रायझेस, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.