Share Market Opening Bell: शेअर बाजारात खरेदीचा जोर कायम, सेन्सेक्स-निफ्टीने गाठली उच्चांकी पातळी
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही खरेदीचा जोर दिसत असून सेन्सेक्स, निफ्टीने पुन्हा उच्चांक गाठला आहे.
Share Market Opening Bell: सोमवारी भारतीय शेअर बाजाराने ऐतिहासिक उसळण घेतल्यानंतर आजदेखील बाजारात तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स (Sensex), निफ्टी (Nifty) आणि बँक निफ्टी (Bank Nifty) निर्देशांकाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सलग दुसऱ्या दिवशी निफ्टीने नवा उच्चांक गाठला. आशियाई शेअर बाजारातही तेजी दिसून येत आहे. हाँगकाँग शेअर बाजारात 3.5 टक्क्यांनी वधारला आहे. जागतिक पातळीवरील शेअर बाजारातील संकेत सकारात्मक दिसून येत आहे. त्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसत आहे.
आज सकाळी निफ्टीत किंचीत घसरण दिसून आली. त्यानंतर निफ्टीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. सकाळी 10.05 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 56 अंकांच्या तेजीसह 18,619.35 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टीने 18,631.65 हा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. तर, सेन्सेक्स 182 अंकांच्या तेजीसह 62,687.63 अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्सने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक 62,724.02 गाठला.
शेअर बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या 10 मिनिटातच सेनसेक्सने 62700 अंकांचा टप्पा ओलांडला होता. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 21 कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 38 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 12 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
बँक निफ्टी निर्देशांकात तेजी दिसून येत असून 217 अंकांच्या तेजीसह 43,237 अंकांवर व्यवहार करत आहे.
सेन्सेक्स निर्देशांकात हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये 2.20 टक्क्यांची तेजी दिसत असून टाटा स्टीलच्या शेअर दरात 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 1.23 टक्के, डॉ. रेड्डीज लॅबच्या 1.17 टक्के आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 1.14 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय, टायटन 1.05 टक्के, सन फार्मा एक टक्क्यांनी आणि अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर दर 0.88 टक्क्यांनी वधारला आहे.
सोमवारी शेअर बाजारात तेजी
सेन्सेक्स सोमवारी पहिल्यांदाच 62700 आणि निफ्टी 18614 अंकांचा टप्पा ओलांडला. शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 62,504 अंकांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18,614 या विक्रमी उच्चांकी पातळीवर जाऊन 50 अंकांच्या वाढीसह 18,562.7 वर बंद झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: