Share Market Opening Bell: शेअर बाजारात अस्थिरतेचे संकेत; घसरणीनंतर बाजार किंचीत वधारला
Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज घसरणीसह झाली. बाजारात आजही अस्थिरता राहण्याची चिन्ह आहेत.
![Share Market Opening Bell: शेअर बाजारात अस्थिरतेचे संकेत; घसरणीनंतर बाजार किंचीत वधारला share market opening bell Sensex opens with falls Nifty below 18400 point levels market indicates Volatility Share Market Opening Bell: शेअर बाजारात अस्थिरतेचे संकेत; घसरणीनंतर बाजार किंचीत वधारला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/17/6012043fc3213e4198b50fcf7f20dd901668660844892290_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात आज घसरणीसह सुरुवात झाली आहे. जगभरातील शेअर बाजारात दिसून आलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स 170 अंकांच्या घसरणीसह 61,812 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी 51 अंकांच्या घसरणीसह 18,358 अंकांवर खुला झाला आहे.
बाजारात सुरुवातीच्या घसरणीनंतर पुन्हा खरेदीचा जोर दिसून आल्याने सेन्सेक्स निर्देशांक वधारला होता. त्यानंतर पुन्हा घसरण झाली. सकाळी 10.10 वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 33.39 अंकांच्या घसरणीनंतर 61,947.33 अंकांवर व्यवहार करत होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 25.50 अंकांच्या घसरणीसह 18,384.15 अंकांवर व्यवहार करत होता. बाजारात आजही अस्थिरता दिसण्याची शक्यता आहे.
बाजारात घसरण सुरू असताना दुसरीकडे फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, इन्फ्रा आणि ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे. तर, बँकिंग, ऑटो, आयटी, मेटल्स सेक्टरमध्ये नफावसुलीचा दबाव दिसून येत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 13 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसत असून 17 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसत आहे. निफ्टी 50 मधील 24 कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसत असून 26 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
पॉवरग्रीडच्या शेअर दरात 1.08 टक्क्यांची, सिप्लामध्ये 0.98 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय, टाटा कंझ्यमुर 0.71 टक्के, भारती एअरटेल 0.62 टक्के, सन फार्मा 0.61 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 0.54 टक्के, अॅक्सिस बँक 0.43 टक्के, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 0.42 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.42 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.
टाटा मोटर्सच्या शेअर दरात दोन टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. टायटन कंपनीच्या शेअर दरात 1.58 कोटी, हिंदाल्कोमध्ये 1.36 टक्के, टेक महिंद्रामध्ये 1.35 टक्के, आयशर मोटर्सच्या शेअर दरात 1.34 टक्के, टाटा स्टीलमध्ये 1.27 टक्के, एचसीएल टेकच्या शेअर दरात 1.03 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
बुधवारी बाजारात अस्थिरता
बुधवारी दिवसभरात शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली असली तरी बाजार बंद होताना मात्र तो काहीसा सावरल्याचं दिसून आले. सेन्सेक्स 107 अंकांनी, तर निफ्टी 6 अंकांनी वधारला.
सेन्सेक्स 61,980 अंकावर तर, निफ्टी 18,409 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही 162 अंकांची वाढ होऊन तो 42,535 अंकांवर बंद झाला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)