![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Share Market Opening Bell: नफावसुलीने शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज सकाळी नफावसुलीने घसरण दिसून आली. मागील दोन दिवस बाजारात तेजी दिसून आली होती.
![Share Market Opening Bell: नफावसुलीने शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला share market opening bell Sensex and Nifty open flat market indicate Volatile in morning session Share Market Opening Bell: नफावसुलीने शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/01e7745b2b4f0d5fbedd50535151ab691663734821415290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Share Market Opening Bell: शेअर बाजारात दोन दिवस दिसत असलेल्या तेजीला आज ब्रेक लागला. नफावसुलीने शेअर बाजारात घसरण (Share Market) झाल्याचे दिसून येत आहे. प्री-ओपनिंगमध्ये दिसून आलेली घसरण बाजार सुरू झाल्यानंतरही कायम राहिली. बँक निफ्टीतही (Bank Nifty) घसरण झाली आहे. अमेरिकन शेअर बाजारातही एक टक्क्यांची घसरण झाली. त्याचा परिणाम जागतिक शेअर बाजारावरही दिसून आला आहे.
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स (Sensex) 215.60 अंकांच्या घसरणीसह 59,504 अंकांवर खुला झाला होता. त्याशिवाय, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 49.90 अंकांच्या घसरणीसह 17,766 अंकावर खुला झाला. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 118 अंकांच्या घसरणीसह 59,601.17 अंकांवर व्यवहार करत होता. तर, 48.40 अंकांच्या घसरणीसह 17,767.85 अंकावर व्यवहार करत होता.
सेन्सेक्समधील 30 पैकी 18 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. नेस्ले, एचयूएल, मारुती, टाटा स्टील, डॉ. रेड्डीज लॅब, महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात वाढ झाली आहे. तर, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, विप्रो, एनटीपीसीच्या शेअर दरात घसरण झाली आहे. टीसीएस, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी आणि इंडसइंड बँकेच्या शेअर दरात घसरण झाली आहे.
प्री-ओपनिंग सत्रात घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीतील तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स 167 अंकांच्या घसरणीनंतर 59,552 व्यवहार करत होता. तर, निफ्टीत 65 अंकांची घसरण दिसून आली. एसजीएक्स निफ्टीदेखील घसरणीसह 17,772 अंकांवर व्यवहार करत होता.
मंगळवारी बाजारात तेजी
मंगळवारी, शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 578 अंकांनी वधारत 59,719 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 194 अंकांनी वधारत 17,816 अंकांवर बंद झाला.
मंगळवारी शेअर बाजारात झालेल्या व्यवहारात बँकिंग सेक्टर, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मीडिया, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टर, ग्राहकोपयोगी वस्तू, एनर्जी, मेटल्स सेक्टरमध्ये शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजारात आज स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)