Share Market Closing Bell : आठ दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजीची हिरवळ; सेन्सेक्स 450 अंकांनी वधारला
Share Market Closing Bell : भारतीय शेअर बाजारात आज खरेदीचा उत्साह दिसून आल्याने बाजार वधारला,
Share Market Closing Bell : मागील आठ दिवसांपासूस घसरणीसह बंद होणाऱ्या शेअर बाजारात (Share Market Updates) आज तेजी दिसून आली. गुंतवूकदारांकडून आज खरेदीचा जोर दिसल्याने बाजार वधारला. आज, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 448.96 अंकांच्या तेजीसह 59,411.08 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 146.90 अंकांच्या तेजीसह 17,450.90 अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 2396 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1009 कंपन्यांचे शेअर दर घसरले. दिवसाखेर 129 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. आज निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 45 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, सेनसेक्स निर्देशांकातील 30 पैकी 28 कंपन्यांचे शेअर दर वधारले.
मेटल इंडेक्स जवळपास 4 टक्क्यांनी वधारला. बँक, आयटी, रियल्टी इंडेक्स हे 1 टक्क्यांनी वधारले. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), अॅक्सिस बँक (AXIS BANK), इंडलसंइड बँक (INDUSINDBK), टेक महिंद्रा (TECHM), टीसीएस (TCS), एचसीएल टेक (HCLTECH), टाटा स्टील (TATASTEEL) , मारुती ( MARUTI ), टाटा मोटर्स (TATAMOTORS) या कंपन्याच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, पॉवरग्रीड ( POWERGRID), एचडीएफसी बँक (HDFCBANK) या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. त्याशिवाय, ब्रिटानिया इंडस्ट्रीज
अदानी समूहाच्या शेअर दरात तेजी
मागील काही दिवसांपासून अदानी समूहाच्या शेअर दरात घसरण सुरू होती. आज, मात्र अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर दर वधारले. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर दर 15 टक्क्यांनी वधारला. अदानी ट्रान्समिशनच्या शेअर दरात 5 टक्क्यांनी वाढ झाली. अदानी टोटल गॅसच्या शेअर दरात 5 टक्क्यांनी वाढला आहे. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर या कंपन्यांच्या शेअर दरात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानी पोर्ट्समध्ये चार टक्क्यांची तेजी आजच्या व्यवहारात दिसून आली. अदानी विल्मरही पाच टक्क्यांनी वधारला आहे. एनडीटीव्ही, एसीसी आणि अंबुजा सिमेंट्सच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.
, पॉवरग्रीड, सिप्ला, बीपीसीएल या कंपन्याच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली.