एक्स्प्लोर

पैसे कमवण्याची पुन्हा मोठी संधी! बड्या कंपनीचा तब्बल 7000 कोटींचा तगडा आयपीओ येणार

शापूरजी पालोनजी या उद्योगसमूहाची एक दिग्गज कंपनी लवकरच आयपीओ घेऊन येणार आहे. हा आयपीओ तब्बल 7000 कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे.

SEBI: शापूरजी पालोनजी उद्योग समूहाच्या एकॉन्स इन्फ्रास्टक्चर (Afcons Infrastructure) या दिग्गज कंपनीचा आयपीओ लवकरच येणार आहे. भांडवली बाजार नियामक सेबीने या कंपनीच्या आयपीओला नुकतीच मंजुरी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकॉन्स इन्फ्रास्टक्चर या कंपनीचा आयपीओ साधारण 7000 कोटी रुपयांचा असू शकतो. या कंपनीने आयपीओच्या मंजुरीसाठी सेबीकडे मार्च, 2024 मध्ये कागदपत्रे सोपवली होती. शापूरजी पालोनजी ग्रुपची ही कंपनी मोठ्या प्रोजेक्स्टसाठी ओळखली जाते. 

किती शेअर विकले जाणार 

मिळालेल्या माहितीनुसार एकॉन्स इन्फ्रास्टक्चर ही कंपनी आयपीओमध्ये 1,250 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर विकणार आहेत. तर  ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून गोस्वामी इन्फ्राटेक (Goswami Infratech) 5,750 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. फ्रेश इश्यूच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पैशांतून ही कंपनी गरजेची कामे करणार आहे. यासह कर्जाची परतफेड करण्यासाठीही या पैशांचा वापर केला जाणार आहे. एकॉन्स इन्फ्रास्टक्चर या कंपनीने या आयपीओसाठी आयसीआयसीआय सिक्योरिटीज, डॅम कॅपिटल, जेफरीज, नोमुरा, नुवामा आणि एसबीआय कॅपिटल बुक रनिंग लीड मॅनेजर तर लिंक इनटाइम ला रजिस्ट्रार म्हणून नियुक्त केले आहे. गेल्या काही दिवसांत शापूरजी पालोनजी उद्योग समूहाने आपल्यावरचे कर्ज कमी करण्यासाठी वेगवेगळ्या मालमत्तांत निर्गुंतवणूक केलेली आहे.  

शापूरजी पालोनजी उद्योग समूहाच्या दोन कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध

एकॉन्स इन्फ्रास्टक्चर या कंपनीत प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुपची 99.48 टक्के हिस्सेदारी आहे. याआधी शापूरजी पालोनजी ग्रुपने स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी (Sterling and Wilson Renewable Energy) या कंपनीचा आयपीओ बाजारात आणला होता. हा आयपीओ अगस्त, 2019 मध्ये शेअर बाजारवर सूचिबद्ध झाला होता. त्यानंतर या कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) खरेदी केले होते. सध्या शापूरजी पालोनजी उद्योग समूहाच्या फोर्ब्स अँड कंपनी (Forbes & Co) आणि गोकाक टेक्सटाइल्स (Gokak Textiles) या दोन कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध आहेत.  

इन्फ्रास्ट्रकचर क्षेत्रात कंपनीचं मोठं नाव 

एकॉन्स इन्फ्रास्टक्चर ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात प्रसिद्ध आहे. या कंपनीने मरीन, शहरी विकास, हायड्रो, अंडरग्राउंड आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमधील मोठे प्रोजेक्ट्स यशस्वीपणे पूर्ण केलेले आहेत. या कंपनीकडे 2021 साली 26,248.46 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स होत्या. 2023 साली याच ऑर्डर्स 30,405.77 कोटी रुपयांवर पोहोचल्या होत्या. या कंपनीचा महसूल आर्थिक वर्षे 2022-2023 मध्ये 14.69 टक्क्यांनी वाढून 12,637.38 कोटी रुपये झाला होता. या कंपनीचा नफादेखील 14.89 टकक्यांनी वाढून 410.86 कोटी रुपयांवर पोहोचला होता. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

मोठी बातमी! सुकन्या समृद्धी योजनेत मोठे बदल, पॅन, आधार कार्डचा 'हा' नियम सर्वांत महत्त्वाचा

सरकारने आणली मुलांसाठी नवी योजना, चिमुकल्यांचं भवितव्य होणार सुरक्षित; जाणून घ्या काय आहे NPS वात्सल्य योजना?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
×
Embed widget