(Source: Poll of Polls)
Share Market Updates : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 340 अंकांनी तर निफ्टी 92 अंकांनी गडगडला
Stock Market Updates : शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) 340 अंकांनी तर निफ्टी (Nifty 50) 92 अंकांनी गडगडला.
Share Market Opening Bell : आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची (Share Market) घसरणीसह सुरुवात पाहायला मिळत आहे. बाजार सुरु होताच सेन्सेक्ससह (Sensex) निफ्टीही (Nifty 50) गडगडला आहे. शुक्रवारी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 340 अंकांनी तर निफ्टी 92 अंकांनी गडगडल्याचं पाहायला मिळालं. जागतिक बाजारात विक्रीचा ओघ पाहता त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसत आहे.
Stock Market Updates : सेन्सेक्ससह निफ्टीची घसरण
आज सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात सेन्सेक्स 340.89 अंकांनी घसरून 60,978.62 अंकांच्या पातळीवर व्यवहार करताना दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टी 92.20 अंकांनी घसरला असून 17,943.65 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. गुरुवारी सेन्सेक्स 44 अंकांच्या किंचित वाढीसह 61,319 अंकांवर बंद झाला. बँकिंग आणि फायनॅन्स सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
Share Market Opening Bell : काय आहे बाजारातील परिस्थिती?
आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, तेल, गॅस, फार्मा, ऑटो क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. तर धातू, ऊर्जा, मीडिया, इन्फ्रा सेक्टरमधील शेअर्स तेजीत आहे. मिडकॅप्समध्ये घसरण होत आहे मात्र, स्मॉल कॅप शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत.
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 9 शेअर्सची घोडदौड सुरु आहे तर 21 शेअर्स घसरले आहेत. याउलट निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह तर 33 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. आज सुरुवातीच्या सत्रात निफ्टी आयटी 1 टक्क्यांनी आणि निफ्टी बँक 0.44 टक्क्यांनी घसरल्याचं दिसत आहे.
जागतिक बाजाराचा परिणाम
अमेरिकेतील व्याजदर वाढण्याच्या शक्यतेमुळे आशियाई बाजारांमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारात आयटी, फार्मा आणि पीएसयू बँकिंग सेक्टरचे शेअर्स घसरले आहेत. नेस्ले इंडियाचे शेअर्स 3.5 टक्क्यांच्या घसरणीसह निफ्टीच्या टॉप लूजर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच, अदानी एंटरप्रायझेस आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्स तेजीत व्यवहार करत आहे.
Share Market Top Gainers : 'हे' शेअर्स तेजीत
आजच्या शेअर बाजारात अल्ट्राटेक सिमेंट 2.73 टक्के, लार्सन 0.70 टक्के, टाटा स्टील 0.67 टक्के, HUL 0.39 टक्के, एशियन पेंट्स 0.33 टक्के, मारुती सुझुकी 0.25 टक्के, रिलायन्स 0.22 टक्के, भारती एअरटेल 0.17 टक्के आणि टाटा 0.70 टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत.
Share Market Top Losers : 'हे' शेअर्स गडगडले
आज सुरुवातीच्या सत्रात नेस्ले 2.43 टक्के, इंडसइंड बँक 1.25 टक्के, विप्रो 1.21 टक्के, एचसीएल टेक 1.03 टक्के, इन्फोसिस 0.91 टक्के, टीसीएल 0.90 टक्के, टेक महिंद्रा 0.89 टक्के, एचडीएफसी 0.09 टक्के तसेत सन फार्मा आणि एचडीएफसी बँक 0.57 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :