एक्स्प्लोर

Adani Share News : अदानी समूहाला मोठा दिलासा! सेबी मोठा निर्णय घेण्याची शक्यता, 'हे' गुंतवणूकदार अडचणीत?

Adani Share News : अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर दरात आणि एकूणच भारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सेबीकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याची चर्चा आहे.

Adani Share News :  अदानी समूह आणि हिंडनबर्ग ( Adani Group Hindenburg Case) प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. मागील काही दिवसात भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) करण्यात आलेल्या शॉर्ट सेलिंगची (Short Selling) सेबीकडून (SEBI) चौकशी करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. शेअर बाजारातील मागील काही सत्रात विक्रीचा मोठा दबाव दिसून आला होता. चौकशीमुळे बाजारातील घसरणीत शॉर्ट सेलर्सच्या भूमिकेबाबतची माहिती समोर येईल असे सूत्रांनी सांगितले. 

शॉर्ट सेलिंगचा मुद्दा जगभरातील सुरक्षा रोखे बाजारात चर्चेचा मुद्दा ठरला आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. शेअर बाजारात आलेली घसरण ही शॉर्ट सेलिंगमुळे असल्याचे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सेबीकडून शॉर्ट सेलिंगची चौकशी करण्यात येणार असल्याचे वृत्त IANS या वृत्तसंस्थेने दिले आहे.

शॉर्ट सेलिंगवर मतभिन्नता 

शॉर्ट सेलिंगचे समर्थक हे सिक्युरिटीज मार्केटचे एक आवश्यक वैशिष्ट्य मानतात. दुसरीकडे, या शॉर्ट सेलिंगमुळे बाजारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जोखीम निर्माण केली जाते. त्यामुळे अस्थिरता निर्माण होण्याचा धोका असल्याचा मुद्दा शॉर्ट सेलिंगचे विरोधक मांडतात. 

IOSCO कडून पारदर्शकतेवर भर 

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशन (IOSCO) ने बाजारात शॉर्ट सेलिंग आणि सिक्युरिटीज कर्ज देण्याच्या पद्धतींचा देखील आढावा घेतला आहे. त्यावर बंदी घालण्याऐवजी शॉर्ट सेलिंगमध्ये पारदर्शकता आणण्याची शिफारस केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये अमेरिकेतील काही वकिलांनी, हेज फंड आणि स्टॉक विरोधात भूमिका घेणाऱ्या रिसर्च फर्मच्या व्यापक तपासातील फसवणुकीच्या आरोपांवर चौकशी करण्याचा विचार केला होता. त्यानुसार, अमेरिकेच्या विधी खात्याने  काही कागदपत्रे, दस्तऐवजेही तपासली असल्याचे वृत्त होते.

हिंडनबर्गकडून सुरू आहे शॉर्ट सेलिंग

रिसर्च फर्म हिंडनबर्गनेदेखील अदानी समूहातील कंपनीच्या विरोधात शॉर्ट सेलिंग करत असल्याचे मान्य केले होते. अदानी समूहाच्या शेअर दरात सुरू असलेल्या घसरणीचा फायदा घेत असल्याचे हिंडनबर्गकडून सांगण्यात आले. हिंडनबर्गने  आपल्या संशोधन अहवालात अदानी समूहावर प्रश्न चिन्ह उभे केले होते. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर दर हे 85 टक्क्यांहून अधिक ओव्हरव्हॅल्यूड असल्याचे दावा केला होता. अदानी समूहाकडून फसवणूक सुरू असून त्यातून शेअर्सचे दर अवाजवी प्रमाणात वाढवले असल्याचा आरोप हिंडनबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये केला होता. 

अदानी समूहाने हिंडनबर्गचे आरोप फेटाळले

अदानी समूहाने रिसर्च फर्म हिंडनबर्गचे आरोप फेटाळून लावले आहेत. अदानी समूहावर करण्यात आलेले आरोप हे तथ्यहीन असल्याचे त्यांनी म्हटले. अदानी समूहाकडून कोणतीही माहिती लपवण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले. 

शॉर्ट सेलिंग म्हणजे काय? (What Is Short Selling in Share Market)

शेअर बाजारात एखाद्या कंपनीचा शेअर विकण्यासाठी तुमच्याकडे तो शेअर असावा लागतो. त्यानंतर तुम्ही त्या शेअर दराची किंमत वधारल्यानंतर त्याची विक्री करू शकता. मात्र, शॉर्ट सेलिंगमध्ये गुंतवणूकदार त्याच्याकडे नसलेला शेअर आधी विकू शकतात. त्यानंतर त्याची किंमत घसरल्यानंतर तो शेअर खरेदी करू शकतात. या व्यवहारातील फरक हा त्याचा नफा ठरतो. 

उदाहरणार्थ,  गुंतवणूकदाराने एका कंपनीचा शेअर 50 रुपयांना खरेदी केला. त्यानंतर या शेअरने 70 रुपये गाठल्यानंतर हा तो विकला. यामध्ये गुंतवणूकदाराला 20 रुपयांचा फायदा झाला. तर, शॉर्ट सेलिंग करताना गुंतवणूकदाराने एका कंपनीचा शेअर खरेदी न करता आधीच 70 रुपयांना विकला. त्यानंतर या शेअरच्या दरात घसरण होऊन तो 20 रुपयांवर गेल्यानंतर गुंतवणूकदाराने त्याला खरेदी केला. या व्यवहारात त्याला 50 रुपयांचा फायदा झाला,  असे म्हणता येते.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar PC : 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्यABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDr. Gauri Kapre Vaidya : ज्यांना फक्त भेटूनच रुग्ण बरा होतो अशा डॉ. गौरी कापरे - वैद्य यांची मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
Embed widget