एक्स्प्लोर

रिटायरमेंटनंतर जवळ 5 कोटी रुपये हवेत? जाणून घ्या गुंतवणुकीचे तीन वेगवेगळे मार्ग!

सध्या वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षी पाच कोटी रुपयांचा फंड उभा करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही तीन पद्धतीने गुंतवणूक करू शकता.

5 Crore Rupees Corpus: आजकाल नोकरदार लवकर निवृत्ती घेतात. लवकर निवृत्त होऊन पुढचे आयुष्य सुखाने जगण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. वृद्धापकाळात चरितार्थासाठी आर्थिक नियोजन झालेले असेल तर मग वयाच्या 60 वर्षांपर्यंत काम करण्याची गरज काय आहे? असा सवाल अनेकजण करतात. त्यामुळेच लवकर निवृत्त व्हायचे असेल तर त्यानुसार तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन आखायला हवे. याच पार्श्वभूमीवर लवकर निवृत्त होण्याचा विचार करत असाल तर आर्थिक नियोजनाचे तीन वेगवेगळे पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या आर्थिक नियोजनानुसार तुमच्याकडे वयाच्या 50 व्या वर्षी तब्बल 5 कोटी रुपये असू शकतात.  

स्ट्रॅटेजी क्रमांक एक 

तुमचे वय हे 25 वर्षे असून तुम्हाला 50 व्या वर्षी निवृत्त व्हायचे आहे असे गृहित धरुया. म्हणजेच तुमच्याकडे कामाचे अजून 24 वर्षे बाकी आहेत. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर साधारण 10 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात असे गृहित धरूया. तुम्हाला अशा स्थितीत वयाच्या 50 व्या वर्षी पाच कोटी रुपायांचा फंड हवा असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षी 1,92,500 रुपये म्हणजेच 1.92 लाख रुपये गुंतवावे लागतील. यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला साधारण 16,042 रुपये गुंतवणूक  करावी लागेल. 

स्ट्रॅटेजी क्रमांक दोन

समजा तुम्ही 30 वर्षांचे आहात आणि तुमच्या निवृत्तीसाठी आणखी 19 वर्षे बाकी आहेत. त्यानुसार तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षी पाच कोटी रुपयांचा फंड उभा करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला साधारण 4 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला महिन्याला 33,333 रुपयांची सेव्हिंग करावी लागेल. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार साधारण एक लाख रुपये असेल तर त्याला त्याच्या पगाराची 30 टक्के रक्कम गुंतवणुकीसाठी बाजूला काढून ठेवावी लागेल. 30 वर्षांपासून गुंतवणुकीला सुरुवात करणे हा थोडा उशिराने घेतलेला निर्णय समजला जातो. त्यामुळेच मासिक बचतीची ही रक्कम जास्त वाटू शकते. 

स्ट्रॅटेजी क्रमांक तीन

तुम्ही सध्या 35 वर्षांचे असाल आणि तुम्हाला तुमच्या वयाच्या 50 व्या वर्षी 5 कोटी रुपयांचा फंड हवा असेल तर तुमच्याकडे बचतीसाठी आणखी 14 वर्षे शिल्लक आहेत. म्हणजेच तुम्हाला 50 व्या वर्षांपर्यंत 5 कोटी रुपयांचा फंड उभा करायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक वर्षाला तुम्हाला 8,85,000 रुपयांची बचत करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला महिन्याला 73,750 रुपयांची सेव्हिंग करावी लागू शकेल. अशा प्रकारे सेव्हिंग केल्यास तुम्ही 14 वर्षांत 8.85 लाख रुपयांची बचत कराल. अशा प्रकारची सेव्हिंग पद्धत वापरून 10 टक्क्यांच्या परताव्याच्या हिशोबाने तुम्ही वयाच्या 50 वर्षांपर्यंत पाच कोटी रुपयांचा फंड उभा करू शकता. 

10 टक्क्यांचा परतावा का गृहित धरला? 

गुंतवणूक क्षेत्रात 10 टक्क्यांचा परतावा हा बेंचमार्क समजला जातो. तुम्ही कोणत्या माध्यमात गुंतवणूक करत आहात. त्याची जोखीम किती आहे. तुम्ही नेमकी कशाची गुंतवणूक करत आहात, किती वर्षांची गुंतवणूक करत आहात? या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यात बदल घडू शकतात. त्यामुळेच साधारण 10 टक्के रिटर्न्सचा बेंचमार्क गृहित धरला जातो.

 (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

Lek Ladki Yojana : 'लाडक्या बहिणीं'ना 1500 तर 'लाडक्या लेकीं'ना 101000; 'लेक लाडकी' योजना आहे तरी काय?

मुकेश अंबानींनाही टाकलं मागे! 'हा' दिग्गज उद्योगपती ठरला भारताचा सर्वोच्च धनिक, संपत्ती तब्बल...

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget