एक्स्प्लोर

Rule Changes : UPI चे नियम, क्रेडिट कार्डवरील विमा संरक्षण ते LPG सब्सिडीपर्यंत, 1 ऑगस्टपासून 7 गोष्टी बदलणार 

Rules Changes : दर महिन्याच्या 1 तारखेला अनेक नियम बदलले जातात. 1 ऑगस्टपासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. याबाबत

नवी दिल्ली : 1 ऑगस्टपासून वित्तीय आणि गैर वित्तीय सेवांसंदर्भातील काही नियम बदलले जाणार आहेत. यामुळं नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. 1 ऑगस्टला गॅसच्या दरांमध्ये बदल जाहीर होऊ शकतात. यूपीआय व्यवहारांसंदर्भातील नवे नियम लागू होणार आहेत. क्रेडिट कार्डवर मिळणारं विमा संरक्षण बंद होणार आहे.

UPI चे नियम बदलणार

1 ऑगस्टपासून यूपीआय संदर्भातील नवे नियम एनपीसीआयनं लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल पे,फोन पे, पेटीएम यूजर्स एका दिवसात 25 वेळा बॅलन्स चेक करु शकतात. ट्रांझॅक्शन हिस्ट्री देखील 25 वेळा पाहता येईल. ऑटो पे सकाळी 10 वाजण्याअगोदर, त्यानंतर दुपारी  1 ते 5 आणि रात्री साडे नऊ नंतर होतील. पेमेंट माघारी घेण्याची एक मर्यादा घालण्यात आली आहे. एका महिन्यात 10 वेळा चार्ज बॅक रिक्वेस्ट करता येईल. एका कंपनीकडून 5 वेळा पैसे परत मागता येतील.  

गॅस सिलेंडरचे दर घटणार?

तेल आणि गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर करतात. घरगुती आणि व्यावसायिक व्यापराच्या सिलेंडरचे दर जाहीर केले जातात. 1 ऑगस्टपासून दरांमध्ये बदल होऊ शकतात. 1 जुलै रोजी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर  60 रुपयांनी घटले होते.

सीएनजीचे दर वाढणार की घटणार?

पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे दर, सीएनजी आणि पीएनजीचे दर देखील जाहीर करतात. 1 ऑगस्ट 2025 ला याच्या दरात बदल होऊ शकतात. सीएनजीचे दर कमी झाल्यास किंवा वाढल्यास त्याचा परिणाम वाहतूक खर्चावर होत असतो.

क्रेडिट कार्डवरील विमा संरक्षण बंद होणार

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 11 ऑगस्टपासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही को ब्रँडेड क्रेडिट कार्डसवर मिळणारं अपघात विमा संरक्षण बंद होणार आहे. यामुळं क्रेडिट कार्ड धारकांचं मोठं नुकसान होणार आहे.

आरबीआय रेपो रेट बाबत निर्णय घेणार

आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची बैठक 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या बैठकीत  आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा आणि इतर सदस्य व्याज दरात कपात करायची की नाही याचा निर्णय घेतील. याचा थेट परिणाम ईएमआय आणि बचत खात्याच्या व्याजावर होऊ शकतो.

ऑगस्टमध्ये बँका किती दिवस बंद राहणार?

आरबीआय प्रत्येक महिना सुरु होण्यापूर्वी देश आणि राज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. आरबीआयच्या माहितीनुसार ऑगस्ट मध्ये 15 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये स्वातंत्र्य दिन,  जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.

पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे पैसे येणार

पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये 9 ते 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ऑगस्टला येणार आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील कार्यक्रमातून याचं वितरण केलं जाणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget