World Richest Person : जगातील श्रीमंतांच्या यादीत अंबानी आणि अदानी कोणत्या स्थानावर? एकूण संपत्ती जाणून घ्या
Mukesh Ambani and Gautam Adani : जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचं स्थान काय आहे, हे जाणून घ्या.
Richest Person on Earth : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे (X) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांना जोरदार दणका बसला असून जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांची घसरण झाली आहे. फ्रेंच उद्योगपती आणि लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड अर्नोल्ट (Bernard Arnault) आता पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. पण, जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचं स्थान काय आहे, हे जाणून घ्या.
अंबानी आणि अदानी यांची एकूण संपत्ती किती?
आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani Net Worth) यांचे नाव फोर्ब्सच्या रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीत 11 व्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 104.4 अब्ज डॉलर्स आहे. तर भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Net Worth) या यादीत 16 व्या स्थानावर आहेत. त्याच्याकडे एकूण 75.7 डॉलर्स बिलियन आहे.
गेल्या आठवड्यात संपत्तीत घसरण
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, 23 जानेवारीला मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2.24 अब्ज डॉलर्स म्हणजेच 18,630 कोटी रुपयांची घट झाली होती. त्यामुळं मुकेश अंबानी यांची संपत्ती 99.1 बिलियन डॉलरवर पोहोचली होती. तर गौतम अदानी यांच्या संपत्तीत 3.38 अब्ज डॉलर म्हणजेच 28,111 कोटी रुपयांची घट झाल्याने त्यांची एकूण संपत्ती ही 90.8 बिलियन डॉलरवर पोहोचली होती. या दोघांच्याही संपत्तीत घट झाल्यामुळं जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत या दोघांचीही एक-एक स्थानाने घसरण झाली होती. पण आथा पुन्हा एकदा दोघांनीही कमबॅक केलं आहे.
बर्नार्ड अर्नोल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
टेस्ला कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे एलॉन मस्क यांना फटका बसला असून त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. फोर्ब्स रिअल टाईम अब्जाधीशांच्या मते, बर्नार्ड अर्नोल्टची एकूण संपत्ती सुमारे 207.6 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. इलॉन मस्कची एकूण संपत्ती आता 204.7 अब्ज डॉलर आहे.
टॉप-10 श्रीमंतांची नावे, जाणून घ्या
फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, बर्नार्ड अर्नोल्ट आणि एलॉन मस्क यांच्यानंतर या यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 181.30 अब्ज डॉलर्स आहे. लॅरी एलिसनचे नाव चौथ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 142.20 अब्ज डॉलर्स आहे. 139.1 अब्ज डॉलर्ससंपत्तीसह, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग या यादीत पाचव्या स्थानावर आहे. यानंतर वॉरन बफेट, लॅरी पेज, बिल गेट्स, सर्जे ब्रिन आणि स्टीव्ह बाल्मर यांच्या नावाचाही जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :