एक्स्प्लोर

सावधान! 'या' बँकेत तुमचं खातं आहे का? RBI ने केला परवाना रद्द, सविस्तर माहिती एका क्लिकवर

आरबीआयने नुकतीच आणखी एका बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने एका सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. पूर्वांचल को-ऑपरेटिव्ह बँक (Purvanchal Co-Operative Bank) असं या बँकेचं नाव आहे.

Bank News : नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक बँकांवर आरबीआय (RBI) कारवाई करत असते. तसेच ज्या बँका आर्थिक डबघाईला (Financial crisis) आल्या आहेत, अशा बँकांच्या संदर्भात देखील पावलं उचलन्याचं काम आरबीआय करते. दरम्यान, आरबीआयने नुकतीच आणखी एका बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने एका सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. पूर्वांचल को-ऑपरेटिव्ह बँक (Purvanchal Co-Operative Bank) असं या बँकेचं नाव आहे. ही बँक उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे आहे.

का केली कारवाई?

RBI ने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. पूर्वांचल को-ऑपरेटिव्ह बँक या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. आदेश जारी करताना आरबीआयने म्हटले आहे की, या बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही. बँकेला बँकिंग व्यवसाय पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सर्वसामान्यांचे नुकसान होऊ शकते असं आरबीआयनं म्हटलं आहे. पूर्वांचल सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे. उत्तर प्रदेशचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना बँक बंद करण्याचे आणि लिक्विडेटरची नियुक्ती करण्याचे आदेश जारी करण्यास सांगितल्याची माहिती आरबीआयने दिली. 

ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणार का?

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, या बँकेत ठेवी असणाऱ्या प्रत्येक ठेवीदाराला त्याची ठेव रक्कम 5 लाखांपर्यंत डिपॉझिट इन्शुरन्स आणि लोन गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून मिळण्याचा अधिकार असणार आहे. पूर्वांचल सहकारी बँकेच्या आकडेवारीनुसार, सुमारे 99.51 टक्के ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी DICGC कडून मिळण्याचा अधिकार आहे. सहकारी बँक सध्याच्या आर्थिक स्थितीसह त्यांच्या सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण देय देण्यास सक्षम नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवरही कारवाई, ठोठावला मोठा दंड

बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे. बँकेला बँकिंग व्यवसाय पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास त्याचा विपरीत परिणाम होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कडक कारवाई केली होती. येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर कारवाई करताना आरबीआयने कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला होता. येस बँक आणि आयसीआयसीआय बँक मध्यवर्ती बँकेच्या अनेक नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे येस बँकेला 91 लाख रुपये आणि आयसीआयसीआय बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने या दोन्ही बँकांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:

RBI चा मोठा निर्णय, तब्बल 7 महिन्यानंतर बँक ऑफ बडोदाला दिलासा, नवीन ग्राहक जोडण्यास परवानगी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Budget 2025 | Mahayuti PC | एकनाथ शिंदेंकडून पुन्हा खुर्ची चर्चेत, शिंदेंच्या मनातून जाईना- अजित पवारBudget Superfast | अर्थ बजेटचा | अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटमधून  सर्वसामान्य जनतेसाठी नेमकं काय?Sandeep Kshirsagar News | ज्यांनी मारहाण केली ती माझी माणसं नाहीत, संदीप क्षीरसागर यांचं स्पष्टीकरणABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
Embed widget