एक्स्प्लोर

RBI : जनधन बँक खात्यांची पुन्हा केवायसी ते सरकारी बाँडमध्ये SIP ची संधी, आरबीआयचे तीन मोठे निर्णय

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकिंग व्यवस्थेसंदर्भात तीन मोठे निर्णय घेतले आहेत. याचा फायदा लोकांना होणार आहे. यामध्ये जनधन खात्यांची रिकेवायसी केली जाणार आहे.

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी ऑगस्टचं पतधोरण विषयक धोरण जाहीर केलं. या बैठकीनंतर सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारे बँकिंग संदर्भातील तीन प्रमुख निर्णय घेतले. जनधन खात्यांची पुन्हा केवायसी केली जाणार आहे. याशिवाय छोट्या गुंतवणूकदारांना सरकारी बाँडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणुकीची संधी आणि खातेधारकाच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैसे आणि लॉकर मधील वस्तू वारसांना देण्यासंदर्भातील प्रक्रिया याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामुळं बँकिंग आणि गुंतवणुकीची संधी प्रत्येक नागरिकाला मिळेल. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीची मदत करणं आरबीआयची जबाबदारी असल्याचं म्हलोत्रा म्हणाले. 

जनधन बँक खाती रीकेवायसीसाठी मोहीम

पंतप्रधान जनधन योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या योजनेद्वारे लाखो बँक खाती उघडण्यात आली होती. आता या खात्यांची पुन्हा एखदा केवायसी करणं गरजेचं आहे. आता लोकांना बँकेत जाऊन रांगा लावत  केवायसी करावी लागणार नाही. 1 जुलै 30 सप्टेंबर या काळात ग्रामपंचायत पातळीवर कॅम्प लावले जातील, तिथं केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. केवायसी करण्यासोबत नवी बँक खाती देखील उघडलीजातील. याशिवाय मायक्रो फायनान्स आणि पेन्शन योजनांची माहिती दिली जाणार आहे. ग्राहकांच्या तक्रारी देखील समजून घेत सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. 

सरकारी बाँडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणुकीची संधी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2021 पासून रिटेल डायरेक्ट सुविधा सुरु केली होती. त्याद्वारे आता सर्वसामान्य लोक आता आरबीआयकडून सरकारच्या बाँडची खरेदी करु शकतात. आरबीआय यातील सुविधा वाढवणार असून छोटे गुंतवणूकदार एसआपीद्वारे ट्रेजरी बिल्स म्हणजेच सरकारच्या अल्पकालीन बाँडमध्ये गुंतवणूक करु शकतात. यामुळं सर्वसामान्य लोकांना सरकारी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मिळेल. एसआयपीद्वारे गुंतवणूक करणं हा सोपा पर्याय आहे. 

खातेदारांच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैसे आणि लॉकरमधील वस्तू देण्याची प्रक्रिया

एखाद्या बँक खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना बँकेतून पैसे आणि लॉकरमधील वस्तू मिळवण्यासाठी खूप कागदपत्रं द्यावी लागत होती. प्रत्येक बँकेचे स्वत:चे नियम असतात. त्यामुळं लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळं आरबीआय सर्वांसाठी एक समान आणि सोपी प्रक्रिया आणणार आहे. त्यामुळं सर्व बँका एकसारखी कागदपत्रं स्वीकारतील त्यासाठी कालमर्यादा निश्चित केली जाईल. यामुळं मृत खातेधारकाच्या वारसदारांना लवकर आणि सहजपणे बँकेतील पैसे आणि लॉकरमधील वस्तू मिळतील. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Embed widget