House Loan : कर्ज घेणाऱ्यांना RBI चा मोठा दिलासा! नवीन कर्जावर वेगळी प्रोसेसिंग फी भरावी लागणार नाही
RBI MPC Meet 2024 : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात जरी काही बदल केला नसला तरीही नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. गृहकर्ज किंवा कार लोन घेणाऱ्या नवीन ग्राहकांना आता कर्ज प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.
RBI MPC Meet 2024 : तुम्हीही नवीन घर किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिझर्व्ह बँकेचे पतधोरण (Monetary Policy Committee MPC) जाहीर करण्यात आलं असून त्यामध्ये कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. .या नव्या नियमानुसार, गृहकर्ज किंवा कार लोन घेणाऱ्या नवीन ग्राहकांना कर्ज प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. आरबीआयने (Reserve Bank of India) रेपो रेट 6.5 टक्के (Repo Rate) इतका कायम ठेवल्याने कर्जाचा ईएमआय (Loan EMI) स्वस्त झालेला नाही. परंतु जे आता नवीन कर्ज घेतील त्यांना कागदपत्रे, प्रक्रिया शुल्क आणि इतर प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. हे त्यांच्या कर्जावरील व्याजात जोडले जाईल.
RBI ने 2024 चे पहिले आर्थिक धोरण जारी केलं असून रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात शेवटचा बदल करण्यात आला होता.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी चलनविषयक धोरण सादर केले. त्यामध्ये हा निर्णय जारी करण्यात आला आहे. आरबीआय दीर्घकाळापासून ग्राहकांसाठी कर्ज आणि त्याच्याशी संबंधित प्रणाली पारदर्शक करण्याचा प्रयत्न करत आहे. मग ते कर्ज वसुलीसाठी नियम बनवणे असो किंवा कर्जावरील व्याज रेपो दराशी जोडणे असो. आता आरबीआयने कर्ज प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्काबाबतही असाच निर्णय घेतला आहे.
कर्ज प्रक्रियेसाठीचे शुल्क वेगळे भरावे लागणार नाही
ग्राहक कर्ज घेण्यासाठी जातात तेव्हा त्यांना सुरुवातीला कागदपत्रे, प्रक्रिया आणि इतर शुल्क भरावे लागतात. त्यामुळे त्यांच्या कर्जावर होणारा खर्च अधिक वाढतो. आरबीआयने आता बँकांना त्यांच्या व्याजदरात कर्जावरील इतर शुल्क समाविष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून ग्राहकांना कळू शकेल की त्यांना त्यांच्या कर्जावर किती व्याज द्यावे लागेल.
की फॅक्ट्स स्टेटमेंट देणं अनिवार्य
यापुढे आता बँकांना त्यांच्या कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना Key Facts Statements'(KFS) द्यावे लागणार आहे. आरबीआयने हे अनिवार्य केलं आहे. की फॅक्ट्स स्टेटमेंट्समध्ये (KFS) ग्राहकांना सर्व तपशील दिले जातात. यामध्ये कर्ज प्रक्रिया शुल्कापासून ते दस्तऐवजीकरण शुल्कापर्यंत सर्वकाही समाविष्ट आहे. RBI ने सर्व प्रकारच्या किरकोळ कर्जे म्हणजे कार, वाहन, वैयक्तिक कर्ज आणि MSME कर्जासाठी हे अनिवार्य केले आहे.
ही बातमी वाचा: