Repo Rate Home Loan: रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला, होम लोनचा हप्ता किती रुपयांनी कमी होणार?
Repo Rate Home Loan: रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात; गृहकर्ज, वाहन कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता. सेन्सेक्सची तुफान उसळी, शेअर बाजारात आनंदाचे वातावरण

Home loan rates after Repo rate changes: भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये मोठ्या कपातीची घोषणा केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर याबाबतची घोषणा केली. त्यानुसार, रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो रेट (Repo Rate) हा 5.50 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होऊ शकतो. रेपो रेटमध्ये (Repo Rate) कपात झाल्यावर बँकांकडून सर्वसाधारणपणे गृहकर्ज (Home Loans) आणि वाहन कर्जाचे (Auto Loan) व्याजदर घटवले जातात. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केला होता. तेव्हा देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँकेने (SBI) गृहकर्जाचा व्याजदर कमी केला होता. त्यामुळे आता रेपो रेटमध्ये इतक्या मोठ्या कपातीनंतर देशभरातली खासगी आणि सार्वजनिक बँका कर्जाचे व्याजदर कमी करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Home Loan Interest Rates: बँकांनी व्याजदर 0.50 टक्क्यांनी घटवल्यास गृहकर्ज घेतलेल्या आणि वाहन कर्ज घेतलेल्यांना किती फायदा?
गृह कर्ज - 50 लाख
व्याजदर - 8 टक्के
काळ - 20 वर्षांसाठी
प्रति महिना बचत - १ हजार ५४२ रुपये
चारचाकी वाहन कर्ज - 10 लाख
वाहन कर्ज - 9 टक्के
काळ - 5 वर्षांसाठी
प्रति महिना बचत - 241 रुपये
RBI decision about repo rate: आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात
यापूर्वी रिझर्व्ह बँकेने सलग दोनवेळा रेपो रेटमध्ये प्रत्येकी 0.25 टक्क्यांची कपात केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची घसघशीत कपात करण्यात आली आहे. यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या दरात कपात होण्याची दाट शक्यता आहे. आरबीआयनं सीआरआर रेशोमध्ये 1 टक्क्यांची कपात केल्याने कॅश रिव्हर्स रेशो 4 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आगामी काळात देशातील महागाई दरही 4 टक्क्यांच्या खाली राहण्याची शक्यता आहे. परंतु, भारतीय अर्थव्यवस्थेला अपेक्षित विकास दर गाठता आलेला नाही.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आर्थिक विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज, याआधी देखील आर्थिक विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज होता. भू-राजकीय तणाव आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे विकास दर वाढण्यात अडचणी येत असल्याचे रिझर्व्ह बँकेचे मत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हातात अधिक पैसा खेळता राहून बाजारपेठेतील मागणी वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्के इतकी मोठी कपात केल्याचे मानले जात आहे.
आणखी वाचा
रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात; गृहकर्ज, वाहन कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता



















