एक्स्प्लोर

RBI Action Bank : रिझर्व्ह बँकेकडून राज्यातील 'या' सहकारी बँकेचा परवाना रद्द; तुमचं इथे खातं आहे का?

RBI Cancelled Co-operative Bank License : पुण्यातील 'सेवा विकास सहकारी बँक' 10 ऑक्टोबरनंतर काम करणार नाही. या बँकेत जमा केलेल्या ग्राहकांचे 99 टक्के पैसे DICGC अंतर्गत येतात.

RBI Cancelled Co-operative Bank License : देशातील सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांच्या कामकाजावर भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) लक्ष ठेवते. कोणत्याही बँकेनं नियमांचं उल्लंघन करताना पकडले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. अलीकडेच आरबीआयने (RBI) राज्यातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई करत बँकेचा परवाना रद्द केला आहे. 

पुण्यातील (Pune) सेवा विकास सहकारी बँकेचा (The Seva Vikas Co-Operative Bank) परवाना आरबीआयनं रद्द केला आहे. बँक चालवण्यासाठी पुरेसं भांडवल नसल्यानं आरबीआयनं परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आगामी काळात ते पुढे चालविण्यासाठी उत्पन्नाचं कोणतंही साधन शिल्लक राहिलेलं नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांचं हित लक्षात घेऊन मध्यवर्ती बँकेनं बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

RBI चं म्हणणं काय? 

रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे की, 10 ऑक्टोबरनंतर बँक काम करणार नाही. सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या आकडेवारीनुसार, बँकेत जमा केलेल्या ग्राहकांच्या पैशांपैकी 99 टक्के रक्कम ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत येते. DICGC नं सांगितलं की, 14 सप्टेंबर 2022 पर्यंत, त्यांनी ग्राहकांना एकूण 152.36 कोटी रुपयांची विम्याची रक्कमेचा परतावा दिला आहे. 

आरबीआयनं म्हटलं आहे की, बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती आणि ती आपल्या खातेदारांना पैसे देण्याच्या स्थितीत नव्हती. अशा परिस्थितीत आरबीआयनं या बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

RBI कडून पैसे जमा करणं आणि काढणं यावर बंदी 

RBI नं सेवा विकास सहकारी बँक लिमिटेड, पुणे मधून ग्राहकांना पैसे काढणं आणि जमा करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. 10 ऑक्टोबरपासूनच बँकेच्या कामकाजावर बंदी घालण्यात आली होती. अशा परिस्थितीत ग्राहक बँकेतून पैसे काढू किंवा जमा करू शकणार नाहीत. 

ग्राहकांना मिळणार विम्याचे फायदे 

ज्या ग्राहकांचे पैसे सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये जमा आहेत. त्यांना 5 लाखांच्या ठेवीवर विमा सुविधा मिळते. ही विमा ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) विमा योजनेअंतर्गत उपलब्ध आहे. DICGC ही भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी आहे, जी सहकारी बँकांच्या ग्राहकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते. अशा परिस्थितीत, खातेधारकाच्या 5 लाखांच्या ठेवीवर, DICGC त्याला संपूर्ण विम्याचा दावा करते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 90 at 9AM Superfast 25 December 2024  सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्याChristmas Special Superfast News : आज जगभरात नाताळचा जल्लोष,राज्यातही उत्साह #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 25 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 8AM Superfast 25 December 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे हात वंचित, अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतिक्षेत
आम्ही पण तुमच्या लाडकी बहिणी.. कष्टाचे पैसे द्या, योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची सरकारकडे मागणी
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget