रामदेव बाबांच्या रुची सोयाचा 4,300 कोटी रुपयांच्या FPO, 615 ते 650 रुपयांची किंमत निश्चित
खाद्य तेल बनवणारी कंपनी रुची सोया सोमवारी (21 मार्च) सकाळी 11:45 मिनिटांनी पत्रकार परिषद घेणार आहे. या माध्यमातून कंपनी आपल्या अनेक योजनांबद्दल माहिती देणार आहे.
Patanjali FPO : खाद्यतेलातील प्रमुख कंपनी रुची सोया इंडस्ट्रीज आगामी फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) साठी 615 ते 650 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली आहे. खाद्य तेल बनवणारी कंपनी रुची सोया याबाबत सोमवारी (21 मार्च) सकाळी 11:45 मिनिटांनी पत्रकार परिषद देखील घेणार आहे. या माध्यमातून कंपनी आपल्या अनेक योजनांबद्दल माहिती देणार आहे.
पतंजली आयुर्वेदची उपकंपनी असलेल्या रुची सोयाने या पत्रकार परिषदेबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. ज्यामध्ये स्वत: रामदेव बाबा, एचएच स्वामी रामदेव, कार्यकारी निर्देशक, आरएसआईएल, आचार्य बालकृष्ण, अध्यक्ष, आरएसआईएल यासह अन्य मंडळी उपस्थित राहणार आहेत. कंपनीचा 4,300 कोटी रुपयांचा एफपीओ 24 मार्च रोजी उघडेल आणि 28 मार्च रोजी बंद होईल. यासाठी इश्यू कमिटीने एफपीओसाठी प्रति शेअर 615 रुपये फ्लोअर प्राईस आणि प्रति शेअर 650 रुपये कॅप किंमत मंजूर केली आहे. यासोबतच किमान बिड लॉट 21 असेल आणि त्यानंतर 21 इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल, असे सादर करण्यात आलेल्या फाईलमधल्या पत्रकात सांगण्यात आले आहे. रुची सोयाचे शेअर्स गुरुवारी बीएसईवर रु. 1,004.45 वर बंद झाला. 650 रुपयांची कॅप किंमत गुरुवारच्या बंद किंमतीवर सुमारे 35 टक्के सूट मध्ये अनुवादित करते. 2019 मध्ये, योगगुरू बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजलीने रुची सोयाला दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे 4,350 कोटी रुपयांना विकत घेतले होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रुची सोयाला भांडवली बाजार नियामक सेबीची एफपीओसाठी मंजुरी मिळाली.
रुची सोया कंपनीच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी, काही थकित कर्जांची परतफेड करून, तिच्या वाढत्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतर सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी संपूर्ण इश्यूचा वापर करेल असं कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. प्रवर्तकांची सध्या खाद्यतेलाच्या प्रमुख कंपनीमध्ये जवळपास 99 टक्के भागीदारी आहे. एफपीओच्या या फेरीत कंपनीला किमान 9 टक्के हिस्सा कमी करणे आवश्यक आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या नियमांनुसार, किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग 25 टक्के साध्य करण्यासाठी कंपनीला प्रवर्तकांचा हिस्सा कमी करणे आवश्यक आहे. प्रवर्तकांचा हिस्सा 75 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी जवळपास 3 वर्षांचा कालावधी आहे. रुची सोया प्रामुख्याने तेलबियांवर प्रक्रिया करणे, स्वयंपाकाचे तेल म्हणून वापरण्यासाठी कच्चे खाद्य तेल शुद्ध करणे, सोया उत्पादने तयार करणे आणि मूल्यवर्धित उत्पादनांचा व्यवसाय करते. त्यात, सनरिच, रुची गोल्ड आणि न्यूट्रेला असे ब्रँड आहेत
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- E-Shram: ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करताय? तर, ही घ्या काळजी, अन्यथा होईल 2 लाखांचे नुकसान
- Edible Oil Price : होळीनंतर खाद्यतेल झाले स्वस्त, पाहा एक लिटरचे तेलाचे दर काय?
- IPO : ओयो आयपीओचा आकार निम्म्याने कमी करणार? तर 'दिल्लीवेरी'ने आयपीओ पुढे ढकलला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha