(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाण्यासारखा पैसा असूनही साधेपणा कायम! ना अलिशान गाडी ना मोबाईल, कोण आहे हा असामान्य व्यक्ती?
कोट्यावधी रुपयांचं साम्राज्य असणाऱ्या पण साधेपणानं जीवन जगणाऱ्या उद्योपगतीची माहिती पाहणार आहोत. श्रीराम ग्रपची स्थापना करणारे राममूर्ती त्यागराजन (Ramamurthy Thyagarajan) असं त्यांचं नाव आहे.
Ramamurthy Thyagarajan : आपल्या देशात कोट्यावधी (Crores) रुपयांची संपत्ती असणारे अनेकजण आहेत. जेवढी संपत्ती जास्त तेवढे शौक, अलिशान जीवनशैली असल्याचं पाहायला मिळतं. संपत्तीनं मोठे असणाऱ्या लोकांकडं महागड्या गाड्या, घरं असतता. पण काही श्रीमंत लोकं साधारण जीवशैली देखील जगत असतात. त्यांच्याकडे पाण्यासारखा पैसा असूनही ते कोणत्याही प्रकारचा बडेजाव करत नाहीत. आज आपण अशाच एका कोट्यावधी रुपयांचं साम्राज्य असणाऱ्या पण साधेपणानं जीवन जगणाऱ्या उद्योपगतीची माहिती पाहणार आहोत. श्रीराम ग्रपची स्थापना करणारे राममूर्ती त्यागराजन (Ramamurthy Thyagarajan) असं त्यांचं नाव आहे.
राममूर्ती त्यागराजन यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. त्यांनी 1.10 लाख कोटींचं सम्राज्य उभं केलं आहे. एवढी मोठी संपत्ती असूनही ते अगदी सर्वसामान्याप्रमाणे जीवन जगत आहेत.सं पत्ती आली की आलिशान जीवनशैली आली असं मानलं जातं. मात्र आज आपण ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत तो या गोष्टीला अपवाद आहे. 1.10 लाख कोटी रुपयांची कंपनीची स्थापन करणारे त्यागराजन छोट्याश्या घरात राहतात. अवघ्या 6 लाखांच्या सॅण्ट्रो कारमधून प्रवास करतात. त्यांच्याकडे साधा मोबाईल फोनही नाही. याबाबत तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. भारतात असा एक उद्योगपती आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
1960 मध्ये श्रीराम ग्रपची स्थापना
राममूर्ती त्यागराजन यांनी 1960 मध्ये श्रीराम ग्रपची स्थापना केली. एका छोट्या कंपनीपासून सुरुवात केली होती. चिट फंड कंपनी म्हणून राममूर्ती त्यागराज यांनी जी कंपनी सुरु केली होती. ती आज 64 वर्षानंतर अर्थिक क्षेत्रातील नावाजलेली कंपनी म्हणून नावारुपास आली आहे. आज श्रीराम फायनान्स कंपनीची किंमत 1.10 लाख कोटी रुपये इतकी आहे. मात्र राममूर्ती त्यागराजन यांनी एवढं यश मिळवलं कसं? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.
राममूर्ती त्यागराजन यांनी एवढं यश मिळवलं कसं?
आर्थिक क्षेत्रामध्ये राममूर्ती त्यागराजन यांनी निवडलेला आगळावेगळा दृष्टीकोन त्यांच्या यशसाठी कारणीभूत ठरला. राममूर्ती त्यागराजन यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका विमा कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून केली. मात्र पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या बँका या मोठ्या लोकसंख्येच्या गरजांकडे दूर्लक्ष करत असल्याचं राममूर्ती त्यागराजन यांना जाणवलं. बँका सामान्यपणे कर्ज नाकारतं अशा लोकांमध्ये ट्रक चालक आणि इतर अल्प उत्पन्न गटातील लोक असतात. बँका या लोकांकडे दूर्लक्ष करतात हे राममूर्ती त्यागराजन यांना प्रकार्षाने दिसून आलं. या लोकांना कर्ज उपलब्ध करुन देत त्यामधून काहीतरी वेगळं निर्माण करता येईल असं जाणवल्यानंतर राममूर्ती त्यागराजन या लोकांना कर्ज देऊ लागले.
त्यागराजन यांना श्रीमंती दाखवायला आवडत नाही
खास करुन उद्योगांसाठी वाहने खरेदी करण्यासाठी राममूर्ती त्यागराजन कर्ज देऊ लागले. यापूर्वी मोठ्या कंपन्या आणि बँकांकडून दूर्लक्षित राहिलेल्या या मोठ्या घटकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली पोकळी राममूर्ती त्यागराजन यांच्या कंपनीने भरुन काढली आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. राममूर्ती त्यागराजन आज फार श्रीमंत आहेत. मात्र त्यांना त्यांची श्रीमंती दाखवायला आणि मिरवायला आवडत नाही. राममूर्ती त्यागराजन हे सर्वसामान्यांप्रमाणे जगण्याला प्राधान्य देतात. राममूर्ती त्यागराजन आजही आलिशान गाडीमधून न फिरता 6 लाखांची सॅण्ट्रो कार वापरतात. ते आधुनिक तंत्रज्ञान वापरत नाहीत.
त्यागराजन प्रकाशझोतापासून दूर
राममूर्ती त्यागराजन यांना प्रकाशझोतापासून दूर राहायला आवडतं. त्यांनी त्याच्या वाट्याची 750 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 628 कोटींच वाटा कंपनीच्या ट्रस्टच्या नावे केला आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राममूर्ती त्यागराजन यांच्याकडे पाहिल्यानंतर खरोखरच यश हे आलिशान जीवनमान आणि आजूबाजूच्या उपभोग घेणाऱ्या वस्तूपुरते मर्यादित नाही.
महत्वाच्या बातम्या: