अयोध्येत फक्त श्रीरामच येणार नाहीत, तर 85 हजार कोटी रुपयेही येणार; काय आहे योजना?
अयोध्येत 'श्री राममंदिर' (Ram Mandir) उभारणीला सुरुवात झाली तेव्हापासून या शहराच्या विकासात (Development) मोठी भर पडली आहे.
Ram Mandir Ayodhya : अयोध्येत 'श्री राममंदिर' (Ram Mandir) उभारणीला सुरुवात झाली तेव्हापासून या शहराच्या विकासात (Development) मोठी भर पडली आहे. अयोध्येच मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरु आहेत. दरम्यान, सध्या लोक 22 जानेवारीची वाट पाहत आहेत, त्या दिवशी 'श्री रामजन्मभूमी मंदिर'चे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहेत. लोक याकडे प्रभू रामाचे अयोध्येतील पुनरागमन म्हणूनही पाहत आहेत. पण खर्या अर्थाने केवळ श्रीरामच 'राममंदिरात परतणार नाहीत, तर याचबरोबर अयोध्येत 85,000 कोटी रुपये येणार आहेत. नेमकी संपूर्ण योजना काय? ते सविस्तर पाहुयात.
धार्मिक पर्यटनाला चालना
अयोध्येत सुरू होणारे राम मंदिर हे देशातील कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे केंद्र तर आहेच, शिवाय या प्रदेशाच्या विकासासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठीही ते विशेष आहे. राम मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळेच पायाभूत सुविधांपासून ते हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी क्षेत्रापर्यंतच्या कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत.
अयोध्येत विकासाची नवी गाथा
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येच्या नवीन रेल्वे स्टेशन आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी अयोध्या क्षेत्रासाठी 15,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे अयोध्येला आधुनिक स्वरूप प्राप्त होईल.
अयोध्येला 'ग्लोबल मेगा टुरिस्ट सिटी' बनवण्याचा निर्णय
अयोध्येतील ‘श्री रामजन्मभूमी मंदिरा’च्या उद्घाटनाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. काही लोक याकडे प्रभू श्री रामाचे अयोध्येला परतणे म्हणूनही पाहत आहेत. पण राम मंदिरात केवळ श्रीरामच परतणार नाहीत, तर अयोध्येच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 85,000 कोटी रुपये येणार आहेत. राम मंदिर परिसराव्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारने अयोध्येची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अनेक प्रकल्पांना निधी दिला आहे. यामुळे अयोध्या आजूबाजूच्या क्षेत्रासाठी एक मोठे आर्थिक केंद्र बनेल आणि तेथील अर्थशास्त्र बदलेल. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येला 'ग्लोबल मेगा टुरिस्ट सिटी' बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
85,000 कोटी रुपयांची ही योजना काय?
अयोध्येच्या मास्टर प्लॅन-2031 नुसार त्याचा पुनर्विकास 10 वर्षात पूर्ण होईल. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दररोज सुमारे 3 लाख पर्यटक अयोध्येत पोहोचण्याची अपेक्षा आहे. इतक्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी येथील पुनर्विकासावर सुमारे 85 हजार कोटी रुपये खर्च केले जातील असा अंदाज आहे. अयोध्येला जागतिक शहर बनवण्यासाठी दिक्षू कुकरेजा यांनी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. राम मंदिर उघडल्यानंतर एका नागरिकामागे 10 पर्यटकांचे प्रमाण असेल. त्यामुळे याठिकाणी शासकीय गेस्ट हाऊस, हॉटेल, व्यापारी संकुले विकसित करण्यात येणार आहेत. हे प्रत्येक प्रकारच्या पर्यटकांच्या गरजा पूर्ण करतील.
केंद्र आणि राज्य सरकारच्या 37 एजन्सी अयोध्येत काम करतायेत
केंद्र आणि राज्य सरकारच्या 37 एजन्सी अयोध्येला नवे रूप देण्यासाठी आधीच कार्यरत आहेत. यासाठी सुमारे 31,660 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. NHAI 10,000 कोटी रुपयांचे प्रकल्प हाताळत आहे. उत्तर प्रदेश सरकार आधीच 75,00 कोटी रुपयांच्या सुमारे 34 प्रकल्पांवर काम करत आहे. तर विमानतळ, रेल्वे आणि महामार्गाचा विकास स्वतंत्रपणे होत आहे.
व्यवसायातही भरभराट
श्री राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा सांगतात की, राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आजूबाजूच्या भागात आर्थिक घडामोडी वाढतील. आता पैसा आला तर व्यवसाय करण्यापासून रोजगारापर्यंतच्या संधी वाढतील. ताज, रॅडिसन आणि आयटीसी सारखे लक्झरी ब्रँड अयोध्येत हॉटेल्स उघडण्यासाठी येत आहेत. तर ओयो सारखे बजेट हॉटेल ब्रँड्सही येथे पोहोचले आहेत. त्याचबरोबर बिसलेरी, पार्लेजी आणि कोका-कोला या कंपन्याही या भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात प्लांट उभारण्यावर भर देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
राजा विक्रमादित्यला गोमाताने दाखवला राम जन्मभूमीचा मार्ग, जाणून घ्या राम जन्मभूमीची आख्यायिका