एक्स्प्लोर

Raju Shetti : शिवार ते मुंबईकर, राजू शेट्टी यांचा प्रवास पूर्ण होणार, म्हाडाच्या लॉटरीपूर्वीच ठरले विजेते, पवईत घर मिळणार...

Mhada Lottery 2024 : म्हाडाकडून 2030 घरांची लॉटरी 8 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे. म्हाडानं अर्जदारांची यादी जाहीर केली असून माजी खासदार राजू शेट्टी विजेते ठरले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाकडून 2030  घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. या लॉटरी प्रक्रियेतील अंतिम यादी म्हाडाकडून जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाकडून 8 ऑक्टोबरला सोडत काढली जाणार आहे.  म्हाडाची लॉटरी जाहीर होण्यापूर्वीच सहा घरांचे विजेते ठरले आहेत. घरांच्या संख्येपेक्षा अधिक अर्ज न आल्यानं सहा जणांचा घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचा समावेश आहे. लोकप्रतिनिधी कोट्यातून त्यांनी अर्ज दाखल केला होता. राजू शेट्टी आता मुंबईकर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

शिवार ते मुंबई असा राजू शेट्टी यांचा प्रवास या निमित्तानं पूर्ण होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतमाल आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या राजू शेट्टी यांनी म्हाडाच्या लॉटरीमध्ये अर्ज दाखल केला होता. लोकप्रतिनिधी कोट्यातून त्यांनी अर्ज केला होता, या कोट्यात एकूण 3 घरं उपलब्ध होती, त्यामध्ये केवळ एक अर्ज आल्यानं राजू शेट्टी यांचा मुंबईकर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

राजू शेट्टी यांना पवईतील कोपरी पवई येथील घरं लागलं आहे. लोकप्रतिनिधी गटातून त्यांचा एकमेव अर्ज आल्यानं लॉटरी जाहीर होण्यापूर्वीच ते विजेते ठरले आहेत.  राजू शेट्टी यांनी ज्या घरासाठी अर्ज केला होता त्याची किंमत 1 कोटी 20 लाख 13 हजार 323 रुपये इतकी आहे. त्यामुळं म्हाडाची सोडत जाहीर होण्यापूर्वीच त्यांचं मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

म्हाडाची सोडत 8 ऑक्टोबरला 

म्हाडाकडून 2030 घरांच्या सोडतीची लॉटरी काढण्यासाठी 8 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केलेली आहे. म्हाडानं अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिल्यानं मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. 1 लाख 13  हजार अर्जदारांनी अर्जासोबत अनामत रक्कम भरली होती. त्या अर्जदारांना घर मिळणार की नाही याचा निर्णय 8 ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं हा कार्यक्रम होणार आहे. ज्या अर्जदारांना घरं लागणार नाही त्यांची अनामत रक्कम 9 ऑक्टोबरपासून परत करण्यास सुरुवात होईल. 

अल्प आणि अत्यल्प गटातील घरांसाठी सर्वाधिक अर्ज 

म्हाडाच्या लॉटरीला अल्प आणि अत्यल्प गटातील अर्जदारांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.  मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांसाठी तुलनेने अर्ज कमी आले आहेत.

दरम्यान, म्हाडाकडून पुढील काळात कोकण मंडळाकडून जवळपास 8 हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. 

इतर बातम्या : 

राजू शेट्टी ते हास्यजत्रा फेम निखील बने, दिग्गजांना हवंय म्हाडाअंतर्गत मुंबईत घर; 2030 घरांसाठी 1 लाख 13 हजार अर्ज पात्र!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Big Fight Vidarbh : विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात बिग फाईटBig Fight Vidarabh Vidhansabha : नंदुरबार, नवापूर, सिंदखेडा विदर्भाच्या बिग फाईटShrikant Shinde Rally | प्रचाराचा शेवटचा दिवस, महायुतीसाठी श्रीकांत शिंदेंचा रोडशोSanjay Shirsat on Kalicharan : कालीचरण यांच्या सभेचा आणि माझा काहीही संबंध नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget