एक्स्प्लोर

Vande Bharat : पुणेकरांसाठी गुड न्यूज, चार नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, शेगाव, सिकंदराबाद, बेळगाव अन् बडोदा प्रवास वेगवान होणार

Vande Bharat : पुणे जंक्शनवरुन येत्या काळात चार नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार असल्याची माहिती आहे. वंदे भारत एक्सप्रेस पुण्यातून शेगाव, सिकंदराबाद, बेळगाव आणि बडोदा या दरम्यान धावतील.

पुणे : पुणे जंक्शनवरुन कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्रातील विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे. पुणे स्टेशनवरुन लवकरच चार नव्या वंदे भारत सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या पुणे स्टेशनवरुन पुणे कोल्हापूर आणि पुणे हुबळी या दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. सध्या सुरु असलेल्या दोन आणि नव्यानं सुरु होणाऱ्या 4 वंदे भारत एक्स्प्रेस अशा एकूण सहा वंदे भारत एक्स्प्रेस पुणे जंक्शनवरुन सुटतील.

पुणे जंक्शनवरुन ज्या चार नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहेत. त्या पुणे-शेगाव, पुणे- बेळगाव, पुणे-बडोदा आणि पुणे-सिकंदराबाद या चार वंदे भारत एक्स्प्रेस नव्यानं सुरु होणार आहेत. या चार वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्यास या मार्गांवरुन रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवासाचा वेळ कमी होईल.

पुणे-शेगांव वंदे भारत एक्सप्रेस : या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड, अहमदनगर (अहिल्यानगर), छत्रपती संभाजीनगर आणि जालना या स्थानकांवर थांबा असेल.

पुणे-बडोदा वंदे भारत एक्सप्रेस: या एक्स्प्रेसला लोणावळा, पनवेल, वापी आणि सूरत या चार स्थानकांवर थांबा असणार आहे. ही एक्स्प्रेस महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून धावेल.

पुणे-सिंकदराबाद वंदे भारत एक्सप्रेस : या वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड, सोलापूर, गुलबर्गा या स्थानकांवर थांबा असेल. या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्यानंतर प्रवासाचा दोन ते तीन तासांचा वेळ वाचेल. ही एक्स्प्रेस महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांमधून धावेल.

पुणे-बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस : ही एक्स्प्रेस पुणे जंक्शन ते बेळगाव या दरम्यान धावेल. वंदे भारत एक्स्प्रेसला सातारा, सांगली आणि मिरज या स्थानकांवर थांबा मिळण्याची शक्यता आहे.

पुणे जंक्शन वरुन नव्यानं या चार वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्यास या शहरांदरम्यानं प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होणार आहे. प्रवासाचा वेळ साधारणपणे 2 तासांनी कमी होऊ शकतो.

याशिवाय आगामी काळात भारतीय रेल्वेकडून पुणे आणि नागपूर दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु केली जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, पुणे जंक्शनवरुन चार नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्यास रेल्वेनं प्रवास करणं आरामदायी आणि आल्हाददायक होईल.

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
Gold Silver Rates Today: सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget