एक्स्प्लोर

Hurun India Rich List : पुण्याच्या नेहा नारखेडेची कमाल, 37 व्या वर्षी जगातिक श्रीमंताच्या यादीत पटकावले स्थान

India Rich List : मूळची भारतीय असलेल्या अमेरिकन नेहा नारखेडेनं स्वत:च्या हिमतीवर जगातील श्रीमंताच्या यादीत स्थान पटकावलेय.

IIFL Wealth Hurun India Rich List : मूळची भारतीय असलेल्या अमेरिकन नेहा नारखेडेनं स्वत:च्या हिमतीवर जगातील श्रीमंताच्या यादीत स्थान पटकावलेय. 37 वर्षीय आंत्रप्रेन्योर नेहा नारखेडे हिने मेहनत, चिकाटी आणि स्वत:च्या हिमतीवर यशाला गवसणी घातली आहे. 

पुण्यात जन्मलेल्या नेहा नारखेडे हिने 37 व्या वर्षी मिळवलेलं यश, अनन्यसाधारण आहे.  नेहा नारखेडे हिने IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 (Wealth Hurun India Rich List ) मध्ये स्थान पटकावलेय. श्रीमंताच्या यादीत नेहा सर्वात तरुण सेल्फ मेड महिला आंत्रप्रेन्योर आहे. नेहा नारखेडे हिचं सुरुवातीचं शिक्षण पुण्यात झालं. त्यानंतर कम्प्युटर सायन्समधील शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली होती. नेहा नारखेडे ही मूळची बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील झोडगा या गावची आहे.आई वडील नोकरी निमित्त पुण्याला आले होते. नेहाचा जन्म पुण्याच्याच आहे. पण ती मूळ गावी लहानपणी क्वचितच आली आहे. गेल्या 30 वर्षांपासून ती इकडे आली नसल्याची माहिती तिचे चुलत भाऊ कुणाल नारखेडे यांनी दिली आहे. कुणाल नारखेडे यांचं मलकापूर येथे कुणाल प्रॉव्हिजन्स नावाचं किराणा दुकान आहे. नेहाचे आईवडील पुण्याला राहत असत जे की आता हयातीत नाहीत. नेहाने पुण्याच्या कुलकर्णी नामक युवकाशी आंतरजातीय विवाह केला व अमेरिकेत स्थायिक झाली. त्यानंतर तिच्याशी कुठलाही संपर्क झाला नसल्याची माहिती कुणाल नारखेडे यांनी दिली. 

नेहा नारखेडे हिने जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजीमधून कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलेय. नेहा नारखेडे सध्या 'कंफ्लुएंट' या कंपनीची सह संस्थापक आहे. त्याशिवाय आपाचे काफ्का (Apache Kafka) या ओपन सोर्स मेसेजिंग सिस्टमला डेव्हलप करण्यात नेहा यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. नेहा नारखेडे सध्या अनेक तंत्रज्ञान कंपनीमध्ये सल्लागार आणि गुंतवणूकदार आहे. हारुन इंडिया रिच लिस्टमध्ये नेहा नारखेडे हिने 336 वं स्थान पटकावलं आहे. नेहा नारखेडे यांची एकूण संपत्ती अंदाजे 4700 कोटी रुपये इतकी आहे.  

लिंक्डइन आणि ओरैकलमध्येही केलेय काम -
स्वत:ची कंपनी सुरु करण्याआधी नेहा नारखेडे यांनी लिंक्डइन आणि ओरैकल या कंपन्यामध्ये काम केलेय. त्याशिवाय अपाचे काफ्का सॉफ्टवेयर तयार करणाऱ्या संघाचा त्या महत्वाच्या सदस्य राहिल्या आहेत. नेहा नारखेडे यांनी 2014 मध्ये स्वत:ची कंपनी सुरु केली. 15 वर्षापूर्वी नेहा नारखेडे या भारतातून अमेरिकेत गेल्या होत्या. त्यांनी तिथे अमेरिकीत कम्प्युटर सायन्समधून मास्टर्सची पदवी घेतली होती. नेहा नारखेडे यांनी पुणे विद्यापिठातून पदवीचं शिक्षण घेतलेय. 
 
फोर्ब्सच्या श्रीमंत सेल्फ मेड महिलांच्या यादीमध्ये नेहा नारखेडे यांनी 57 वाा क्रमांक पटकावला होता.  2018 मध्ये फोर्ब्स ने तंत्रज्ञानाशी निगडित असणाऱ्या महिलांच्या यादीत नेहा नारखेडे यांच्या नावाचा समावेश केला होता.   हुरुन इंडिया यांच्यानुसार, श्रीमंताच्या यादीत 1000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या एकूण 1103 लोकांचा सहभाग होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत या यादीत यंदा 96 जणांची वाढ झाली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report
Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget