एक्स्प्लोर

आलिशान घरांच्या मागणीत दुप्पट वाढ, नेमकी का होतेय मागणीत वाढ? 

भारतात आलिशान घरांची (Luxury Housing) मागणी झपाट्याने वाढत आहे. कोरोनापासून लोकांना पुन्हा मोठ्या घरांची गरज भासू लागली आहे.

Property Demand in India: भारतात आलिशान घरांची (Luxury Housing) मागणी झपाट्याने वाढत आहे. कोरोनापासून लोकांना पुन्हा मोठ्या घरांची गरज भासू लागली आहे. यामुळेच 2023 मध्ये लक्झरी घरे आणि व्हिला विभागाची मागणी सर्वाधिक होती. आता 2024 मध्येही स्थिती राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकांचे वाढते उत्पन्न, अर्थव्यवस्थेची चांगली स्थिती आणि बदलती जीवनशैली यामुळं आलिशान घरांची मागणी गेल्या वर्षी 112 टक्क्यांनी वाढली आहे.

प्रॉपर्टी फर्म NoBroker च्या अहवालानुसार, 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये भारतात लक्झरी घरांची मागणी 112 टक्क्यांनी वाढली आहे. वाढत्या उत्पन्नामुळं आणि बदलत्या जीवनशैलीमुळं हे घडत आहे. नो ब्रोकरच्या मते, 2023 मध्ये देशात लक्झरी घरांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2022 च्या तुलनेत लक्झरी रियल्टी मालमत्तेची विक्री दुपटीने वाढल्याचे कंपनीने म्हटले आहे. मिळालेल्या अहवालानुसार, मेट्रो शहरांमध्ये व्हिला घेण्याची मागणी वाढत आहे. दिल्ली-एनसीआर, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर), हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये या आलिशान घरांना सर्वाधिक मागणी निर्माण झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या मेट्रो शहरांमधील लोकांचे वाढते उत्पन्न हे आहे. 

लोकांचे प्राधान्यक्रम बदलत आहेत

नोब्रोकरचे संस्थापक सौरभ गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रियल इस्टेट मार्केटमध्ये लक्झरी हाऊसिंग क्षेत्र सर्वात वेगाने वाढत आहे. मोठ्या आणि चांगल्या समाजात राहण्याची लोकांमध्ये मोठी इच्छा आहे. लोकांचे प्राधान्यक्रम बदलत असल्याचे त्यांनी सांगितले. खरेदीदारांचे बजेटही वाढले आहे. हाय नेट वर्थ (HNI) आणि अल्ट्रा हाय नेट वर्थ व्यक्ती (UHNI) ची संख्या झपाट्याने वाढली आहे. केवळ राहण्यासाठीच नाही तर गुंतवणुकीसाठीही हे लोक प्रॉपर्टीला चांगला पर्याय मानत आहेत. वाढती महागाई देखील त्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहे.

मेट्रो शहरांमध्ये मागणी झपाट्याने वाढली

मिळालेल्या आकडेवारीनुसार, बंगळुरुमधील सर्जापूर आणि देवनहल्ली, ग्रेटर नोएडा, दिल्ली-एनसीआरमधील नोएडा आणि गुरुग्राम, एमएमआर, कोल्लूर, मुंबईतील तेल्लापूर आणि हैदराबादमधील मोकिला हे गेल्या वर्षभरात मोठ्या संख्येने व्हिला लॉन्च करुन हॉटबेड म्हणून उदयास आले आहेत. कोविडपूर्व वर्षांच्या तुलनेत बंगळुरुमध्ये व्हिलाच्या मागणीत 32 टक्क्यांनी जास्त होती. यानंतर दिल्ली एनसीआरमध्ये 25 टक्के, मुंबईत 30 टक्के आणि हैदराबादमध्ये 27 टक्के वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! SBI ने व्याजदर सवलतीची मुदत वाढवली, 2 लाखांची बचत होणार

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती सादर करा, प्रताप सरनाईक यांचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती सादर करा, प्रताप सरनाईक यांचे निर्देश
Gold and Silver Rate: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 4 हजारांनी तर, चांदी 10 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 4 हजारांनी तर, चांदी 10 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; वेळ ठरली, दिसला की तोडला, 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
Pune Mayor Flex: 'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Embed widget