'या' शेतकऱ्यांना PM किसानचा 16 वा हप्ता मिळणार नाही, कारण...जाणून घ्या सविस्तर माहिती
PM Kisan 16th Installment: येत्या 28 फेब्रुवारीला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना 16 वा हप्ता मिळणार नाही.
PM Kisan 16th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) 16 वा हप्ता कधी जमा होणार याची सर्वांनाचं प्रतीक्षा होती. मात्र, ही प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या 28 फेब्रुवारीला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना 16 वा हप्ता मिळणार नाही. कारण, ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची कागदपत्रे अपलोड करणे, सक्रिय बँक खात्याशी आधार लिंक आणि ई-केवायसी ( Ekyc) केली नाही, त्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता मिळणार नाही.
28 फेब्रुवारी 2024 ला 16 वा हप्ता जमा होणार
PM किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16 व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. PM किसान सन्मान निधीचा चा 16 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून हस्तांतरित करणार आहेत. ज्यामध्ये हा हप्ता डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल.
9 कोटी शेतकरी कुटुंबांना फायदा होणार
पीएम किसान योजनेद्वारे, सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक 6000 ची आर्थिक मदत दिली जात आहे. ज्यामुळे आतापर्यंत 11 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना 2.81 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी रोजी 16 वा हप्ता जारी करतील. या अंतर्गत सुमारे 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 21 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.
PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी 'या' गोष्टी गरजेच्या
पीएम किसानच्या 16 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, जमिनीची कागदपत्रे अपलोड करणे, सक्रिय बँक खात्याशी आधार लिंक करणे आणि ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे काम केले नाही त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता जमा केला जाणार नाही. म्हणजेच 16 व्या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. ओटीपी आधारित ई-केवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधला जाऊ शकतो. अधिक माहितीसाठी http://pmkisan.gov.in ला भेट द्या.
महत्वाच्या बातम्या: