एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Post Office Fixed Deposit : पोस्ट ऑफिसमध्ये एका वर्षाच्या FD वर मिळतंय 'इतकं' व्याज, जाणून घ्या 5 मोठ्या बँकांना मिळणारा 'हा' परतावा!

Post Office Fixed Deposit : अनेक मोठ्या बँका ग्राहकांना एफडीवर उच्च परतावा म्हणजेच रिटर्न्स देत आहेत. जाणून घ्या

Post Office Fixed Deposit : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) रेपो दर (Repo Rate) वाढवण्याची घोषणा केल्यानंतर देशातील बहुतांश मोठ्या बँकांनी एफडी व्याजदरात वाढ केली आहे. याचा फायदा ग्राहकांनाही झाला आहे. अनेक मोठ्या बँका ग्राहकांना एफडीवर उच्च परतावा म्हणजेच रिटर्न्स देत आहेत. बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवल्यानंतरही, पोस्ट ऑफिस एफडी आणि बँक एफडीमध्ये गुंतवणूक करण्याबाबत ग्राहक संभ्रमात आहेत. या बातमीत तुम्हाला पोस्ट ऑफिस आणि देशातील मोठ्या बँकांद्वारे देऊ केलेल्या व्याजदरांबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा व्याजदर 1 वर्षापर्यंतच्या मुदतीच्या FD वर दिला जातो.

ग्राहकांना मिळतोय चांगला परतावा 

पोस्ट ऑफिस एफडी योजनेत गुंतवणूक करून ग्राहकांना चांगला परतावा मिळतो. तुम्ही पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये 1 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 5.5 टक्के परतावा मिळेल. तुम्ही 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीसह पोस्ट ऑफिस एफडी उघडू शकता. दुसरीकडे, 5 वर्षांपर्यंतच्या FD वर, तुम्हाला बँकेत 6.70 टक्के पर्यंत व्याजदर मिळेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया देते किती व्याज दर?

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.90 टक्के आणि 1 ते 2 वर्षांच्या FD वर 5.10 टक्के व्याजदर देते.

HDFC बँक

देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक HDFC बँक आपल्या ग्राहकांना 1 वर्षापर्यंतच्या FD वर 5.10 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 1 वर्षापर्यंतच्या FD वर 5.10 टक्के व्याजदर देते.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना 1 वर्षासाठी FD वर 5 टक्के परतावा देते. ICICI बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँक 2 कोटींपेक्षा कमी एफडीवर 1 वर्षाच्या कालावधीत सुमारे 5.10 टक्के व्याजदर देते.

महागाईमुळे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या चिंतेत वाढ 

एप्रिल महिन्यात किरकोळी महागाईने मागील आठ वर्षाचा उच्चांक गाठला. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर हा 7.79 टक्के इतका नोंदवण्यात आला. महागाईच्या या आकड्याने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या चिंतेत वाढ केली आहे. जून महिन्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीत रेपो दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्ज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या रेपो दर 4.40 टक्के असून हा दर 4.75 टक्के इतका होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास कर्ज आणि कर्जाचे हप्ते आणखी महाग होणार आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या

Share Market Updates : शेअर बाजार काल कोसळला, आज सावरला; सेन्सेक्सची 1000 अंकानी भरारी

Repo Rate and EMI : रेपो दरात 0.4 टक्क्यांनी वाढ, तुमच्या गृहकर्जावर कसा होतोय परिणाम? समजून घ्या गणित

RBI: जूनमध्ये कर्ज आणखी महाग होणार? रेपो दरात वाढ होण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकरABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Sawant Mahim : ठाकरेंच्या लेकाला हरवलं,सरवणकरांना घरी बसवलं; महेश सावंत EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
Embed widget