एक्स्प्लोर

PM Kisan : 10 कोटी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार, पीएम किसानचा 20 वा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता

PM Kisan 20th Instalment Update : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे एका वर्षात शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात.

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून चालवली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये दिले जातात. पीएम किसान सन्मान निधीची ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. चार महिन्यांच्या अंतरानं पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. पीएम किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. आता चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आल्यानं शेतकऱ्यांच्या खात्यात 20 व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येऊ शकते. या योजनेचे 10 कोटी लाभार्थी 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची रक्कम 20 जूनच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. 

 पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम 10 कोटी 4 लाख 67 हजार 693 शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. आता 10 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवायचे असल्यास शेतकऱ्यांना देखील काही गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे. 

पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी, आधार सीडिंग आणि जमीन रेकॉर्ड पडताळणी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेसाठी निधी उपलब्ध करुन दिला जातो. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. केंद्र सरकारनं  या योजनेची घोषणा 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. त्याची अंमलबजावणी फेब्रुवारी 2019 पासून करण्यात आली. सुरुवातीपासून आतापर्यंत 3.04 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. 

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी  योजनेच्या वेबसाईटवर  जाऊन किती हप्त्यांची रक्कम मिळाली. यासंदर्भातील माहिती  आणि इतर तपशील तपासू शकतात. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 19 हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे. म्हणजेच जे शेतकरी पहिल्या हप्त्यापासून लाभार्थी आहेत त्यांना त्यांना 38 हजार रुपये मिळाले आहेत. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मानच्या निधीची प्रतीक्षा 

महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात.  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मानच्या 6 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. आता त्या योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Mhada Lottery : म्हाडा मार्च 2027 पर्यंत मुंबईतील 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी काढणार, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांची घोषणा
गुड न्यूज, म्हाडा मार्च 2027 पर्यंत मुंबईतील 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी काढणार, मिलिंद बोरीकर यांची घोषणा
साखरेच्या दरात 30 टक्क्यांची घसरण! मात्र, ग्राहकांना दिलासा नाहीच, महाग दरातच खरेदी करावी लागतेय साखर, नेमकं कारण काय? 
साखरेच्या दरात 30 टक्क्यांची घसरण! मात्र, ग्राहकांना दिलासा नाहीच, महाग दरातच खरेदी करावी लागतेय साखर, नेमकं कारण काय? 
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर किती कोटींचं कर्ज? आकडेवारी सांगत कर्जाबाबत म्हणाले...
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर किती कोटींचं कर्ज? कर्जाबाबत म्हणाले...

व्हिडीओ

Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा भावनिक विद्यानंद बापट यांना फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Embed widget