PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये लवकरच मिळणार, 'तीन' गोष्टींची खात्री करुन घ्या, अडचणीशिवाय पैसे जमा होणार
PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्याकंडून करण्यात येत होती. शेतकऱ्यांना पीएम किसानच्या हप्त्यामध्ये 2000 दिले जातात.

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपयांची रक्कम दिली जाते. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत 18 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. आता 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठीची पूर्वतयारी केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून केली जात आहे. त्यापूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेतकऱ्यांना तीन गोष्टींची पूर्तता करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या तीन गोष्टी पूर्ण केल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात 19 व्या हप्त्याची रक्कम येईल.
कोणत्या गोष्टींची पूर्तता करायची?
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेतकऱ्यांना ई केवायसी, डीबीटी इनेबल बँक खाते आणि जमीन पडताळणी करुन घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हे आवाहन करताना विशेष म्हणजे पहिल्यांदा 19 व्या हप्त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार हे निश्चित आहे.
ई केवायसी कशी करायची?
पीएम किसान सन्मान निधीचं अधिकृत अॅप प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करा. ते इन्स्टॉल करा. त्यानंतर लॉगीन पर्यायासमोर लाभार्थी हा पर्याय निवडा. नोंदणी कर्मांक किंवा आधार क्रमांक टाका. आधार क्रमांक टाकल्यानंतर स्कॅन फेसिंगचा पर्याय स्वीकारा. त्यानंतर तुमची ई केवायसी प्रक्रिया पुढील 24 तासांमध्ये पूर्ण झालेली दिसेल. ई केवायसी तुम्ही सीएससी केंद्रांवर देखील करु शकता. याशिवाय शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यातील डीबीटी इनेबल हा पर्याय सुरु करुन ठेवणं देखील आवश्यक आहे.
जमीन पडताळणी आवश्यक
ज्या शेतकऱ्यांच्या पीएम किसान रेकॉर्डमधील त्रुटींमुळं लँड रेकॉर्ड दिसत नाही त्यांची पीएम किसान सन्मान निधीची रक्कम रोखली जाते. शेतकऱ्यांना लँड रेकॉर्डची पडताळणी करुन घेतलयानंतर संबंधित रक्कम दिली जाते. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती आहे, अशाच शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीची रक्कम दिली जावी हा केंद्र सरकारचा हेतू आहे.
पीएम किसानचा 19 वा हप्ता कधी मिळणार?
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमातून 5 ऑक्टोबरल 2024 ला वितरित करण्यात आली होती. येत्या काही दिवसांमध्ये बिहारमध्ये शेतीसंदर्भातील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी सहभागी होणार असल्याची माहिती आहे. तो कार्यक्रम 24 फेब्रुवारीला होणार आहे, त्या दिवशी 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :
























