एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price: पेट्रोलवर तेल कंपन्यांना प्रतिलिटर 10 रुपये नफा, मात्र तरीही ग्राहकांना दिलासा नाहीच; आजचे दर काय?

Petrol-Diesel Price Today: गेल्या सात महिन्यांपासून देशभरात इंधन दर स्थिर आहेत. देशातील चार महानगरांसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आज तेलाच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात...

Petrol-Diesel Price Today 7th January 2023: भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. इंधन दरांमध्ये तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. तब्बल सात महिन्यांहून अधिक काळापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. जाणून घेऊया आजचे दर काय? 

आजचे कच्च्या तेलाचे दर 

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत (Crude Oil) घट नोंदवली जात आहे. WTI क्रूड ऑइलची किंमत (WTI Crude Oil Price) किंचित वाढ झाल्यानंतर प्रति बॅरल 73.77 डॉलरवर पोहोचली आहे. घसरणीनंतर ब्रेंट क्रूड ऑईल 78.57 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीचा आज भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर (Petrol Diesel Price) परिणाम झालाय का? जाणून घ्या, तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर.

पेट्रोलवर तेल कंपन्यांना प्रतिलिटर 10 रुपये नफा, मात्र तरिही ग्राहकांना दिलासा नाहीच 

तेल कंपन्यांना सध्या प्रत्येक लिटर पेट्रोलवर 10 रुपये नफा मिळतोय, असं असूनही कंपन्यांनी दीर्घकाळ किंमती स्थिर ठेवल्यानं त्याचा ग्राहकांना फायदा झालेला नाही. दुसरीकडे डिझेलवर मात्र, तेल कंपन्यांना प्रतिलिटर 6.5 रुपये तोटा सहन करावा लागतोय. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) या सरकारी कंपन्यांनी मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल केलेला नाही. त्यांना 24 जून 2022 च्या आठवड्यात पेट्रोलवर 17.4 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 27.7 रुपये प्रति लिटर तोटा सहन करावा लागला होता.

ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत या कंपन्यांना पेट्रोलवर नफा झाला असला तरी डिझेलवर मात्र तोटा सहन करावा लागत आहे. एप्रिल-मे मध्ये कच्च्या तेलाच्या किमती 103 डॉलरवर पोहोचल्या असतानाही या कंपन्यांनी किमती बदलल्या नाहीत. त्यामुळे त्यांचं त्यावेळी मोठं नुकसान झालं होतं. कच्च्या तेलाच्या किमती जूनमध्ये 116 डॉलरवरून आता 78-79 डॉलरवर आल्या होत्या.

मे महिन्यापासून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किमतीत विक्रमी घसरण होत असताना सर्वांच्या नजरा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीकडे लागल्या होत्या. पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींत घट होणार का? याकडे सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं होतं. पण आजही भारतील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget