Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाचे पुन्हा घसरले, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिलासा? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली असून इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
Petrol Diesel Price Today 19th November 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) चढ-उतार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी 100 डॉलर प्रति बॅरल इतका दर असणाऱ्या कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून आली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलच्या (Brent Crude Oil) दरात प्रति बॅरल 2.41 टक्क्यांनी म्हणडे 2.16 डॉलरची घसरण झाली आहे. तर, WTI क्रूड ऑईलच्या दरात प्रति बॅरल 1.56 डॉलरची घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांनी आजचे इंधन दर जाहीर केले आहेत. कंपन्यांनी भारतीय ग्राहकांना कोणताही दिलासा नाही. आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
कच्च्या तेलाचे दर काय?
शनिवारी, सकाळी WTI क्रूड ऑईलचा दर 80.08 डॉलर प्रति बॅरल इतका होता. तर, ब्रेंट क्रूड ऑईलचा दर हा 87.62 डॉलर प्रति बॅरल इतका होता. काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाच्या दरात उसळण आली होती. ब्रेंट क्रूड ऑईलचा दर प्रति बॅरल हा 100 डॉलरजवळ पोहचला होता.
पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच
मे महिन्यात केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दर कमी झाले. त्यानंतर जुलै महिन्यात महाराष्ट्र सरकारने करात कपात केल्याने पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले होते.
देशातील प्रमुख शहरातील दर
> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर
> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर