Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त? कच्च्या तेलाच्या दरातील घसरण कायम, आजचे इंधन दर जाणून घ्या...
Petrol Diesel Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील घसरण कायम आहे. आगामी काळात इंधन दरात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Petrol Diesel Rate Today : भारतील तेल कंपन्यांनी आजचे नवीन इंधन दर (Petrol-Diesel Price Today) जारी केले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील घसरण कायम आहे. आगामी काळात इंधन दरात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घसरणा झाल्याचा कोणताही परिणाम अद्याप पेट्रोल-डिझेलच्या दरावर दिसून आलेला नाही. आज 18 सप्टेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हिंदुस्तान पेट्रोलियम (Hindustan Petroleum), इंडियन ऑयल (Indian Oil) आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी (Bharat Petroleum) पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.
देशात आजही इंधनाचे दर स्थिर आहेत. सुमारे चार महिन्यांपासून इंधन दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने 21 मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानंतर पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात झाली. त्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मे महिन्यापासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील घसरण कायम आहे. आगामी काळात इंधन दरात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 91 डॉलरवर आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम इंधन दरावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.
देशातील प्रमुख महानगरामध्ये पेट्रोल-डिझेलचा दर
मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर (Petrol Diesel Price in Mumbai) इतका आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत (Petrol Diesel Price in Delhi) पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने मिळत आहे. कोलकातामध्ये (Petrol Diesel Price in Kolkata) पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर इतका आहे. चेन्नईत (Petrol Diesel Price in Chennai) पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर इतका आहे.
तुमच्या शहरातील किंमत अशा प्रकारे तपासा
तुम्हालाही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासायचे असतील तर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. तुम्ही जर बीपीसीएलचे ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP<डीलर कोड> लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवा. पेट्रोल आणि डिझेलची किंमत तुम्हाला कळेल. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवा. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर तपासू शकता.