एक्स्प्लोर

Fuel Price: ब्रेंट क्रूड 75 डॉलर प्रति बॅरल पार; पेट्रोल-डिझेल महागलं? झटपट चेक करा दर

Petrol Diesel Price: आज देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांती एक लिटर पेट्रोलच्या किमती...

Petrol Diesel Price Update: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Price) सातत्यानं चढ-उतार होत आहेत. कच्च्या तेलाच्या दरांत आज मोठी उसळी पाहायला मिळाली. डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल (WTI Crude Oil) आज 4.05 टक्क्यांच्या वाढीसह 71.34 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईलच्या (Brent Crude Oil) किमतींतही 3.86 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. ते प्रति बॅरल 75.30 डॉलरवर व्यापार करत आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. 3 मे 2023 रोजीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. आज सलग 349 वा दिवस असून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. 

मे 2022 पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Prices) कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचवेळी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर 

  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33  रुपये प्रति लिटर

देशात मे 2022 नंतर किंमतींमध्ये कोणताही बदल नाही

शेवटच्या वेळी पेट्रोल-डिझेलचे दर मे 2022 मध्ये बदलले होते. त्यानंतर पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये उत्पादन शुल्क कमी करण्यात आलं. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 9.5 आणि 7 रुपयांनी कमी झाले आहेत. जुलै 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 5 आणि 3 रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील दर आणखी घटले होते. 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत का होतात बदल? 

मूल्यवर्धित कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी विविध बाबींवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. इंधन दरांमध्ये शेवटचा देशव्यापी बदल गेल्या वर्षी 21 मे रोजी झाला होता, जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटर कपात केली होती. 

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP MajhaCity 60 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 23 Jan 2025Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत,  एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीसDattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Embed widget