Sovereign Gold Bond : मोदी सरकारच्या 'या' योजनेत पैसे गुंतवलेले झाले मालामाल! 12.9 टक्के वार्षिक परतावा
Sovereign Gold Bond Scheme : भारतीय रिझर्व्ह बँकेने 2015 मध्ये सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेला सुरुवात केली होती. या योजनेचा पहिला मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाला आहे.
Sovereign Gold Bond Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचं सरकार 2014 मध्ये पहिल्यांदा केंद्रात सत्तेवर आलं. यानंतर मोदी सरकारने एक शानदार योजना सुरु केली होती. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यांना आता बंपर फायदा झाला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर फक्त एक वर्षानंतर आरबीआयने सुवर्ण गुंतवणूक योजना सुरू केली. ही योजना म्हणजे सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजना.
'या' योजनेत पैसे गुंतवलेले झाले मालामाल!
सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेचा पहिला आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ही योजना तुम्हाला बाजारापेक्षा कमी किमतीत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेअंतर्गत 2.75 टक्के वार्षिक परतावा मिळतो. सार्वभौम गोल्ड बाँड योजनेअंतर्गत परिपक्वता कालावधी 8 वर्षे आहे. या योजनेचा पहिला 8 वर्षांचा हप्ता 30 नोव्हेंबर रोजी मॅच्युरिटी पूर्ण झाली. या आठ वर्षांत गुंतवणूकदाकांना 12.9 टक्के व्याज मिळालं आहे.
12.9 टक्के वार्षिक परतावा
सॉव्हरिन गोल्ड बाँड (SGB) च्या पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदारांना 12.9 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. यामध्ये वार्षिक 2.75 टक्के व्याज देखील सामील आहे. 2015 मध्ये, या योजनेंतर्गत, सोन्यात गुंतवणुकीची संधी 2,684 रुपये प्रति ग्रॅम या दराने देण्यात आली होती. त्यावेळी, मॅच्युरिटीवर एक ग्रॅमची किंमत 6,132 रुपये झाली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, पहिल्या टप्प्यातून 245 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.
SGB गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय
एसजीबी (Sovereign Gold Bond) एक गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. दर यामध्ये मेकिंग चार्ज, जीएसटीचा विषय नसतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सरकारची योजना असल्याने सुरक्षेची हमी मिळते. ज्या प्रकारे सोने वाढेल अथवा कमी हा होईल त्यानुसार SGB च्या किंमती पण बदलतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एसजीबी (Sovereign Gold Bond) द्वारे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंटची आवश्यकता नसते. त्यामुळे तो खर्च वाचतो. त्याशिवाय यामधील गुंतवणुकीवर सरकार आपल्याला दरवर्षी 2.5 टक्क्यांप्रमाणे व्याज मिळते. सोने गुंतवणुकीत किमान आठ वर्षांचा लॉक इन पीरियड असतो. म्हणजे सोप्या गणितात सांगायचं तर एसजीबीमध्ये आठ वर्षांच्या मुदतीवर निव्वळ वीस टक्के वाढ काहीही न करता मिळते.
सॉव्हरिन गोल्ड बाँड म्हणजे काय?
सॉव्हरिन गोल्ड बाँड हा एक सरकारी बाँड आहे. ही योजना आरबीआयच्या वतीनं जारी केली जाते. सरकानं ही योजना 2015 मध्ये सुरु केली होती. यामध्ये सोन्याच्या वजनाच्या रुपात खरेदी करु शकतो. जर हे बाँड 5 ग्रॅमचे असतील तर याची किंमत 5 ग्रॅम सोन्याच्या बरोबरीनं असते.
सॉव्हरिन गोल्ड बाँडचे फायदे
सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेत गुतवणूकदारांना वार्षिक 2.5 टक्के दरानं व्याज मिळतं. यामध्ये कॅपिटल गेन टॅक्समध्ये सूट मिळते. या योजनेंतर्गत सोने खरेदीसाठी जीएसटी आणि मेकिंग चार्ज द्यावा लागत नाही. या व्यतिरिक्त, आपण हे कोलॅटरल म्हणून देखील वापरू शकतो. आपण स्टॉक एक्सचेंजद्वारे ट्रेड करू शकता. महत्त्वाचं म्हणजे या बाँड्सच्या सिक्योरिटीबाबतही गुंतवणूकदारांना टेन्शन घेण्याची गरज नाही.