search
×

Gold Bond Scheme : स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी! डिसेंबर आणि फेब्रुवारीमध्ये SGB मध्ये गुंतवणूकीची संधी

Sovereign Gold Bond Scheme : सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना डिसेंबर आणि फेब्रुवारीमध्ये नव्याने सुरु होत आहे. स्वस्त सोनं खरेदी करण्याची ही संधी सोडू नका.

FOLLOW US: 
Share:

Sovereign Gold Bond 2023-2024 : जर तुम्ही सोने खरेदीच्या (Gold Rate) विचारात असाल, पण सोन्याचे वाढलेले दर पाहून तुम्ही चिंतेत असाल, तर तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी (Gold Shopping) करण्याची संधी आहे. सोनं गुंतवणूकदारांसाठी सरकारची उत्तम योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही जास्त नफा कमावू शकता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेच्या (SGB Scheme) नवीन हफ्त्याला सुरुवात होत आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond Scheme) योजनेच्या पुढील हफ्त्याला डिसेंबर 2023 आणि फेब्रुवारी 2024 मध्ये सुरुवात होत आहे. 

स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी!

अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी यासंदर्भात माहिती दिली आहे. यानुसार सॉव्हरिन गोल्ड योजनेचा तिसरा आणि चौथा हप्ता 2023-24 डिसेंबर आणि फेब्रुवारीमध्ये जारी केला जाईल. त्यामुळे 18 डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर 2023 दरम्यान तुम्हाला सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात गुंतवणूक करता येईल. तर चौथा हफ्ता मालिका 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान सुरू होईल.

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची खास वैशिष्ट्ये

तुम्ही ऑनलाइन माध्यमातून सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला इश्यू किमतीमध्ये प्रति ग्रॅम 50 रुपये अतिरिक्त सूट मिळते. सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत, तुम्ही एकूण आठ वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक करू शकता. दरम्यान, तुमच्याकडे पाच वर्षांनंतर योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सर्वात पहिल्यांदा ही योजना सुरू केली होती. SGB ​​मध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला प्रतिवर्ष 2.50 टक्के व्याजदराचा लाभ देखील मिळतो. हा व्याज दर सहामाही आधारित असतो.

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेत कोण गुंतवणूक करू शकते?

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून चालवण्यात येते, त्यामुळे यामध्ये सुरक्षेची हमी मिळते. या योजनेअंतर्गत तुम्ही एका वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकता. तर ट्रस्ट आणि संस्था एका वर्षात 20 किलो सोने खरेदी करू शकतात.

किंमत किती?

सध्या, रिझव्‍‌र्ह बँकेने सॉव्हरिन गोल्ड बाँडच्या तिसर्‍या आणि चौथ्या मालिकेची फक्त तारीख जाहीर केली आहे. IBJA च्या शेवटच्या तीन दिवसांच्या सरासरी सोन्याच्या किमतीनुसार इश्यूची किंमत ठरवली जाईल. डिजिटल मोडला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेत सोनं कसं खरेदी करायचं?

योजनेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या मालिकेत सोने खरेदी करण्यासाठी तुम्ही स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), NSE, BSE मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, पोस्ट ऑफिस आणि व्यावसायिक बँकांशी संपर्क साधू शकता. SGB ​​अंतर्गत सोनं खरेदी करण्यासाठी KYC आवश्यक आहे. यासोबतच पॅनकार्ड असणंही आवश्यक आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sovereign Gold Bond : मोदी सरकारच्या 'या' योजनेत पैसे गुंतवलेले झाले मालामाल! 12.9 टक्के वार्षिक परतावा

Published at : 09 Dec 2023 10:13 AM (IST) Tags: Personal Finance gold business Gold Bond Sovereign Gold Bond Scheme Investment

आणखी महत्वाच्या बातम्या

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

टॉप न्यूज़

Shatrughan Sinha Health Updates : शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...

Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...

Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा

IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा