search
×

Stock Market Opening : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 73,000 तर, निफ्टी 150 अंकांनी खाली

Share Market Opening : शेअर बाजाराची सुरुवाता घसरणीसह झाली असून सेन्सेक्स 73,000 वर आणि निफ्टी 150 अंकांनी घसरला आहे.

FOLLOW US: 
Share:

मुंबई : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराची (Share Market) घसरणीसह सुरुवात झाली आहे. आज मंगळवारी शेअर बाजार सुरु (Stock Market) होताच सेन्सेक्समध्ये (Sensex) 500 अंकांची घसरण झाली तर निफ्टी (Nifty 50) 100 अंकांनी खाली कोसळली. आशियाई बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होताना दिसत आहे. परिणाम आजच्या सत्राच्या सुरुवातीला घसरण पाहायला मिळत आहे. 

शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात

आज भारतीय शेअर बाजाराची निराशाजनक सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. याशिवाय, इराण-इस्त्राईल युद्धाचा भारतीय रुपयावर परिणाम दिसून येत आहे. भारतीय रुपया नीचांकी पातळीवर उघडला, रुपया प्रति डॉलर 83.51 वर व्यवहार करत आहे. इतकंच नाही, तर कच्च्या तेलाचे भावही चढेच आहेत. कच्च्या तेलाचे दर 91 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.

सेन्सेक्स-निफ्टीत घसरण

आज सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले आहेत. बँक निफ्टीमध्ये सुमारे 450 अंकांची घसरण झाली आहे. बीएसई (BSE) सेन्सेक्स 507.64 अंक म्हणजेच 0.69 टक्क्यांच्या घसरणीसह 72,892 वर उघडला आणि एनएसई (NSE) निफ्टी 147.20 अंक म्हणजेच 0.66 टक्क्यांच्या घसरणीसह 22,125 वर उघडला.

सेन्सेक्स शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त 10 शेअर्स घोडदौड दिसून येत आहे आणि 20 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. वाढत्या शेअर्समध्ये, टाटा स्टीलचा सर्वाधिक फायदा झाला आहे आणि त्यासोबतच मारुती सुझुकी, टायटन, M&M, नेस्ले आणि JSW स्टीलचे शेअर्स वधारत आहेत. घसरलेल्या शेअर्समध्ये इंडसइंड बँक 1.48 टक्के, बजाज फायनान्स 1.26 टक्क्यांनी खाली आहे. इन्फोसिस 1.25 टक्के आणि बजाज फिनसर्व्ह 1.07 टक्क्यांनी घसरला आहे. कोटक महिंद्रा बँक 1.06 टक्क्यांनी कमजोर आहे आणि आयसीआयसीआय बँक शेअर 0.95 टक्क्यांनी घसरला आहे.

NSE निफ्टी शेअर्सची स्थिती

NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 22 शेअर्समध्ये वाढ होत आहे आणि 28 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. ओएनजीसी टॉप गेनर शेअर असून 1.43 टक्क्यांनी वाढला आहे. यासह आयशर मोटर्स, मारुती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे.

Published at : 16 Apr 2024 10:07 AM (IST) Tags: Share Market Sensex Stock Market BSE NSE Share Market Opening Bell NIFTY Share Market Opening

आणखी महत्वाच्या बातम्या

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

नोकरी करता करता 'या' मार्गाचा अवलंब करा, पगारापेक्षा जास्त पैसे मिळवा, सविस्तर माहिती एका क्लिकवर

नोकरी करता करता 'या' मार्गाचा अवलंब करा, पगारापेक्षा जास्त पैसे मिळवा, सविस्तर माहिती एका क्लिकवर

तरुण व्यावसायिक: बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटसह संपत्तीनिर्मितीची सुरुवात करा

तरुण व्यावसायिक: बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटसह संपत्तीनिर्मितीची सुरुवात करा

कागदपत्रांशिवाय तत्काळ मिळवा रोख कर्ज; तातडीच्या रोख कर्जाच्या मदतीने तुम्ही सर्व लहान आणि मोठे खर्चांचे आरामात व्यवस्थापन करा

कागदपत्रांशिवाय तत्काळ मिळवा रोख कर्ज; तातडीच्या रोख कर्जाच्या मदतीने तुम्ही सर्व लहान आणि मोठे खर्चांचे आरामात व्यवस्थापन करा

टॉप न्यूज़

पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र

पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश

अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव

अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान