NPS Vatasalya Calculation: वर्षाला 10,000 रुपये साठवल्यानं तुमचं मूल कोट्यधीश होऊ शकतं; NPS वात्सल्य योजनेत गुंतवणूक कशी कराल?
NPS Vatsalya Calculator: केंद्र सरकारनं 18 वर्षाखालील मुलांसाठी एनपीएस वात्सल्य ही विशेष पेन्शन योजना सुरू केली आहे. ही योजना प्रामुख्यानं लहान मुलांसाठी सुरू करण्यात आली आहे.
NPS Vatsalya Calculator: अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी जुलै 2024 च्या अर्थसंकल्पात (Budget) एका नव्या योजनेती घोषणा केली होती. त्यानुसार, NPS अंतर्गत मुलांना देखील पेन्शन सुरू करण्यात आलं होतं. अर्थसंकल्पात लागू करण्यात आलेली योजना 18 सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे. NPS वात्सल्य योजनेंतर्गत, 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा कोणताही अल्पवयीन व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
केंद्र सरकारनं 18 वर्षाखालील मुलांसाठी एनपीएस वात्सल्य ही विशेष पेन्शन योजना सुरू केली आहे. ही योजना प्रामुख्यानं लहान मुलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलांमध्ये गुंतवणूक करून त्यांचं भविष्य सुरक्षित करू शकतात. या योजनेअंतर्गत, सरकार जमा केलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याजदराचा लाभ देत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प 2024 मध्ये या योजनेची घोषणा केली होती. ही योजना देशातील 75 ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. सध्या या योजनेंतर्गत 250 हून अधिक कायमस्वरूपी सेवानिवृत्ती खातं क्रमांकांचं वाटप करण्यात आलं आहे. जाणून घ्या, या योजनेतील काही खास गोष्टी...
NPS वात्सल्य योजना म्हणजे काय?
NPS वात्सल्य योजनेंतर्गत, गुंतवणूक करून पालक आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करू शकतात. या योजनेअंतर्गत, तुम्ही तुमच्या मुलांसाठी दरमहा किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. या योजनेचा लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा आहे. लॉक-इन कालावधी संपल्यानंतर, मूल 18 वर्षांचं झाल्यावर, शिक्षण, आजार इत्यादी कारणांसाठी एकूण योगदानाच्या 25 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते. आणीबाणीच्या परिस्थितीत, 3 वेळा पैसे काढता येतात. तुम्ही हे खातं बँक, पोस्ट ऑफिस, ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा ई-एनपीएसद्वारे उघडू शकता.
📊 Your Pension Potential with #NPSVATSALYA
— PIB in Chandigarh (@PIBChandigarh) September 18, 2024
• Annual Contribution: ₹10,000
• Investment Duration: 18 years
• Expected Corpus at 18: ₹5 lakh @10% RoR
Expected Corpus at 60:@10% RoR: ₹2.75 Cr@11.59%* RoR: ₹5.97 Cr@12.86%# RoR: ₹11.05 Cr
Start your investment today! pic.twitter.com/S7pt00MuT2
तुमचं मूल बनेल कोट्यधीश
NPS कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही मुलाच्या NPS वात्सल्य खात्यात दरवर्षी 10 हजार रुपये गुंतवले, तर मूल 18 वर्षांचं होईपर्यंत एकूण जमा रक्कम 5 लाख रुपये होईल. यामध्ये 10 टक्के अंदाजे परतावा अंतर्गत 5 लाख रुपयांचा निधी जमा केला जाईल. जर 60 वर्ष वयापर्यंत गुंतवणूक सुरू राहिली तर 10 टक्के अंदाजे परताव्यावर आधारित तुम्हाला 2.75 कोटींचा निधी मिळू शकतो. अंदाजे 11.59 टक्के परताव्यावर तुम्ही 5.97 कोटी रुपयांचे मालक व्हाल. जुर एखाद्या व्यक्तीला अंदाजे 12.86 टक्के परतावा मिळत असेल, तर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी 11.05 कोटी रुपयांचा निधी मिळू शकतो.
कोणती कागदपत्र आवश्यक?
NPS वात्सल्य खातं उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबद्दल बोलताना, अल्पवयीन व्यक्तीच्या जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला / मॅट्रिक प्रमाणपत्र, पॅन आणि पासपोर्ट) असणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, पालकांकडे ओळख आणि पत्त्याचा KYC पुरावा (आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, NREGA जॉब कार्ड आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) असणं आवश्यक आहे. जर NRI असेल तर अल्पवयीन व्यक्तीचं NRE/NRO बँक खातं असावं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :