(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Home Loan EMI Hike: आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर तुमचा EMI कितीने वाढला? जाणून घ्या
Home Loan EMI Hike: आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर तुमच्या गृहकर्जाचा EMI वाढणार आहे. नेमका किती रुपयांनी हा कर्जाच्या हप्त्यात वाढ झाली हे जाणून घ्या...
Home Loan EMI Hike: नवीन वर्षात तुमच्या कर्जाचे हप्ते आणखी वाढणार आहेत. रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले असून रेपो दरात वाढ (RBI Hike Repo Rate) केली आहे. रेपो दरात वाढ केल्याने कर्ज महागली आहेत. आरबीआयने मे महिन्यापासूनच्या पतधोरण बैठकीत आतापर्यंत 1.90 टक्क्यांची वाढ केली आहे. मागील आठ महिन्यात रेपो दर हा 4 टक्क्यांहून 6.25 टक्के इतका झाला आहे.
आरबीआयच्या निर्णयाचा परिणाम काय?
आरबीआयच्या या निर्णयानंतर सरकारी, खासगी बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्या गृहकर्जाचे व्याजदर वाढवणार आहेत. त्याच्या परिणामी तुमच्या कर्जाचे हप्ते महाग होणार आहे. सध्याच्या गृहकर्जाच्या व्याजदरात 0.35 टक्के वाढ होणार आहे.
20 लाखाच्या गृह कर्जावर EMI किती वाढणार?
तुमच्या कर्जाचा हप्ता (EMI) किती वाढला हे जाणून घेण्यासाठी उदाहरण समजून घेऊयात. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 20 वर्षांच्या मुदतीवर 25 लाखाचे कर्ज घेतले आहे. सध्या तुम्हाला 8.40 टक्के इतका व्याज दर आकारला जातो. त्यानुसार, तुम्हाला 21,538 रुपयांचा ईएमआय भरावा लागतो. आता रेपो दरात 35 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गृहकर्जावरील व्याज दर आता 8.75 टक्के इतका होणार आहे. त्यासाठी 22,093 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. याचाच अर्थ दरमहा 555 रुपयांची वाढ झाली असून दरवर्षी 6,660 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.
15 वर्षाच्या मुदतीत 50 लाखांचे गृहकर्ज घेतले असल्यास तुम्हाला दरमहा 48,944 रुपयांचा EMI भरावा लागतो. आता, रेपो दरात वाढ झाल्याने गृहकर्ज दर 8.70 टक्के इतका होणार आहे. त्यानुसार, 49,972 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. दरमहा 1028 रुपये अधिक भरावे लागणार आहेत.
EMI चा हप्ता तेवढाच राहणार पण...
सर्वसाधारणपणे, बँकांकडून ईएमआय स्थिर ठेवला जातो. परंतु कर्जाचा कालावधी वाढवला जातो. रेपो दर वाढीचा व्याज दरावर परिणाम होतो. त्यामुळे रेपो दर वाढल्यानंतर तुमचा ईएमआय स्थिर असला तरी त्याच्या कर्ज परतफेडीच्या कालावधीमध्ये वाढ होते. थोडक्यात तुम्ही व्याजाची अधिक रक्कम बँकेला अधिकच्या वर्षात परतफेड करत असता.
पुढील वर्षापासून दिलासा मिळणार?
रेपो व्याज दरवाढ पुढील वर्षांपासून थांबवण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाईचा दर कमी होणार असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी वर्तवला. महागाई दर 4 टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: