search
×

Post Office RD: पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं RD खाते आहे? मग तुम्हाला सहजपणे मिळेल कर्ज

Loan Against Post Office RD : पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही आरडी बचत कराल असाल तर तुम्हाला त्यावर सहज कर्ज उपलब्ध होऊ शकेल.

FOLLOW US: 
Share:

Loan Against Post Office RD :  जर तुम्ही सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर स्मॉल सेव्हिंग स्कीम हा एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये जोखीम न घेता आणि हमीपरताव्यासह दीर्घकाळ गुंतवणूक करू शकता. याशिवाय पोस्ट ऑफिस स्कीम्सवरही तुम्ही कर्ज घेऊ शकता. तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटवर  (Post Office Recurring Deposit) देखील कर्ज घेऊ शकता. सरकारने या योजनेवरील व्याजात नुकतीच वाढ केली होती.

पोस्ट ऑफिस RD वर किती व्याज?

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटवरील  (Post Office Recurring Deposit) व्याजदरात 20 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस RD वर आता 6.5 टक्क्यांऐवजी 6.7 टक्के वार्षिक व्याज मिळेल.

तुम्हाला मिळेल आरडीवर कर्ज 

आरडी खात्यावरही ग्राहक कर्ज घेऊ शकतात. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेल्या आरडीवर कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुम्ही किमान 12 महिने आरडीची रक्कम ठेवी असावी. खाते एक वर्षापासून सुरू असले पाहिजे म्हणजेच खाते एक वर्ष जुने असावे. आरडी खातेधारकाला पोस्ट ऑफिसमधून त्याच्या खात्यातील शिल्लक रकमेच्या केवळ 50 टक्के कर्ज मिळू शकते. कर्जाची रक्कम एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये परत केली जाऊ शकते. पोस्ट ऑफिसमधून घेतलेल्या या कर्जासाठी ग्राहकाला आरडीच्या व्याजदरापेक्षा 2 टक्के जास्त व्याज द्यावे लागेल. समजा तुम्हाला RD वर 6.3 टक्के व्याज मिळत असेल, तर कर्जाचा व्याजदर 8.3 टक्के असेल.

कर्ज कसे घ्यावे?

आरडी खात्यावर कर्ज घेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या पासबुकसह कर्जाचा फॉर्म भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून कर्ज मिळेल.

RD वर किती व्याज मिळते?

दरमहा 5000 रुपयांच्या आरडीमध्ये, तुम्ही एका वर्षात 60, 000 रुपये आणि पाच वर्षांत एकूण 3, 00, 000 रुपयांची गुंतवणूक कराल. तुम्हाला 5 वर्षानंतर 6.7 टक्के दराने 56,830 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीवर तुम्हाला 3,56,830 रुपये मिळतील. तुम्ही आरडीमध्ये दर महिन्याला 3,000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही एका वर्षात 36,000 रुपये गुंतवाल. 5 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक रु 1,80,000 असेल. पोस्ट ऑफिसच्या आरडी कॅल्क्युलेटरनुसार, नवीन व्याजदरांनुसार, तुम्हाला 34,097 रुपये व्याज म्हणून मिळतील. मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण रु 2,14,097 मिळतील.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Published at : 28 Nov 2023 11:21 PM (IST) Tags: post office loan Saving Schemes Investment tips Investment

आणखी महत्वाच्या बातम्या

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

टॉप न्यूज़

निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?

निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?

Sanjay Raut: दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले

Sanjay Raut: दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले

Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?

Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?

PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू

PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू