वयाची चाळीशी फार महत्त्वाची! 'या' बाबींचे नियोजन करा अन् बिनधास्त जगा
वयाच्या चाळीशीत तुम्ही भविष्याचे नियोजन न केल्यास तुमच्या आयुष्याचा उत्तरार्ध, वार्धक्य, तसेच मुलांचे भविष्य अडचणीत सापडू शकते. त्यामुळे भविष्यात या अडचणी येऊ नयेत म्हणून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
वयाची चाळीशी हा आयुष्यातील फार महत्त्वाचा काळ असतो. याच काळात तुम्हाला परिपूर्ण आयुष्य जगावं वाटतं. मौज, मजा, फिरणं यासारख्या विरंगुळ्यासाठी हा काळा तसा चांगलाही आहे. पण याच काळात तुम्हाला तुमच्या भविष्यातील महत्त्वाच्या टप्प्याचे नियोजनही करायचे असते. वयाच्या चाळीशीत तुम्ही भविष्याचे नियोजन न केल्यास तुमच्या आयुष्याचा उत्तरार्ध, वार्धक्य, तसेच मुलांचे भविष्य अडचणीत सापडू शकते. त्यामुळे भविष्यात या अडचणी येऊ नयेत म्हणून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
वयाच्या चाळीशीत तुम्हाला स्वत:चा विकास करायचा असतो, सोबतच तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही पुढचा टप्पा गाठायचा असतो. याच वयात तुम्हाला एक आदर्श पालकही व्हायचे असते. या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि चांगली जीवनशौली यासाठी एक सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे. खालील सात गोष्टींवर लक्ष देऊन तुम्ही वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी साध्य करू शकता.
तुमचा खर्च तपासत राहा
वयाच्या चाळीशीदरम्यान तुम्ही करिअरच्या दृष्टीकोनातून सुस्थितीत असता. त्यामुळे या काळात तुम्ही महागड्या जीवनशैलीचा अंगीकार करू शकता. मात्र खर्च करताना शिस्त बाळगणे गरजेचे असते. याच काळात तुम्ही शिस्त बाळगली तर तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित राहू शकते. त्यामुळे तुम्ही नेमकं कशावर खर्च करताय? कोणत्या अनावश्यक गोष्टीवर तुम्ही खर्च करताय? याचा वेळोवेळी अभ्यास करणे गरजेचे आहे. असे केल्यास तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित राहू शकते.
जीवन विमा खरेदी करा
तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. जीवन विमा हा तुमच्या कुटुंबाला सुरक्षित तर करतोच. पण तुमचे कुटुंब सुरक्षित असल्यामुळे तुम्हाला मन:शांतीही लाभते. तुम्ही परवडणारा एक टर्म इन्शुरन्स घ्यायला हवा. भविष्यात काही अघटीत घडलं तर हाच विमा तुमच्या कुटंबाला सुरक्षित ठेवतो.
गुंतवणूक करा, बचत करा
चाळीशी हे बचतीचे आणि गुंतवणुकीसाठीचे वय आहे. या वयात तुमचा एक डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ असायला हवा. तुमच्या या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स, बाँड्स, म्युच्यूअल फंड असायला हवेत. दीर्घकालीन स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही या वयात गुंतवणूक करायला हवी. तुमच्या मुलाचे भवितव्य, निवृत्तीनंतरचे आयुष्य यासाठी ही गुंतवणूक करावी. या गुंतवणुकीसाठी तुम्ही गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा.
एक पालक म्हणून मुलाचे भवितव्य सुरक्षित करणे ही तुमची जबाबदारी आहे. शिक्षणापासून ते मुलाच्या इतर गरजा यासाठी पालक म्हणून तुम्ही वयाच्या चाळीशीपासूनच नियोजन केले पाहिजे. असे केल्यास तुमच्या मुलाला त्याच्या भविष्यात योग्य आणि सर्वोत्तम संधी मिळेल.
इमर्जन्सी फंडकडे दुर्लक्ष करू नका
जीवनात कधी कोणता प्रसंग येईल हे सांगता येत नाही. याच अनपेक्षित प्रसंगांना तोंड देण्यासाठी आर्थिदृष्ट्या सक्षम असणे गरेजेचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे एक इमर्जन्सी फंड असायला हवा. आपत्कालीन स्थितीत सहा किंवा बारा महिने उदरनिर्वाहास अडचण येणार नाही, एवढा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असायला हवा.
आरोग्य विमा काढा
आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर कोणता आजार होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे तुमचा तसेच तुमच्या कुटुंबीयांचा आरोग्य विमा असणे गरेजेचे आहे. आरोग्य विम्यामुळे तुम्हीच नव्हे तर तुमच्या कुटुंबालाही आरोग्यविषयक आणीबाणीत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही. आरोग्य विमा असेल तर प्रतिबंधात्मक काळजी आणि रेग्यूलर हेल्थ-चेकअपचाही फायदा होतो. त्यामुळे तुमच्या कुटंबाची आरोग्यविषयक गरज भागेल एवढा आरोग्य विमा असणे गरेजेचे आहे.
सेवानिवृत्तीनंतरचा प्लॅन असणे गरजेचे आहे
वायाची चाळीशी गाठल्यानंतर तुम्ही निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा विचार करणे गरजेचे आहे. निवृत्तीनंतरही तुमचे जीवनमान चांगले राहावे यासाठी तुम्ही आतापासून रिटायरमेंट प्लॅन करायला हवा. तसे केल्यास निवृत्तीनंतर आर्थिक तसेच इतर अडचणी येत नाहीत. निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये यासाठी परताव्याची हमी देणाऱ्या प्लॅन्समध्ये गुंतवणूक करा. तसे केल्यास निवृत्तीनंतर तुमच्याकडे पैसे असतील तसेच तुम्ही निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात घालवू शकाल.
तुम्हाला निवृत्तीनंतर सुखकारक आयुष्य जावे यासाठी एखादा गॅरंटीड प्लॅन शोधत असाल तर HDFC Life Pension Guaranteed Plan हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला कधी हवे आहेत, याची तुम्ही निवड करू शकता. तुम्हाला गुंतवलेले पैसे हे पेन्शनच्या रुपात कधी हवेत, हे निवडण्याची सोय या प्लॅनमध्ये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदारालाही समाविष्ट करता येते. म्हणजेच या प्लॅनमधील बेनिफिट्स तुम्हाला तसेच तुमच्या जोडीदारालाही मिळू शकतात.
त्यामुळे वयाच्या चाळीशीत वर नमूद केलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. आर्थिक आणि वैयक्तिक नियोजन करून तुम्ही तसेच तुमच कुटुंबीय सुखी आणि आनंदी राहू शकता.
(Disclaimer - This article is a featured article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live do not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article/advertisement and/or views expressed herein. Reader discretion is advised.)