search
×

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

भारतात सोन्याला फक्त सौंदर्यदृष्ट्या आणि प्रतिकात्मक मूल्यासाठी महत्त्व नाही तर कर्ज मिळवण्यासाठी तारण म्हणून त्याच्या क्षमतेलाही मोठे महत्त्व आहे.

FOLLOW US: 
Share:

रु. 2 कोटींपर्यंतचा निधी त्वरित मिळवा फक्त 9.50% प्रती वर्षापासून सुरू होणार्‍या व्याजदराने

भारतात सोन्याला फक्त सौंदर्यदृष्ट्या आणि प्रतिकात्मक मूल्यासाठी महत्त्व नाही तर कर्ज मिळवण्यासाठी तारण म्हणून त्याच्या क्षमतेलाही मोठे महत्त्व आहे. वैयक्तिक कर्ज घेण्याच्या वाढत्या पार्श्वभूमीवर, त्वरित रोख रक्कम हवी असणार्‍या लोकांसाठी गोल्ड लोन (Gold Loan) हा मुख्य स्रोत म्हणून समोर येत आहे.

या लोनची संकल्पना अगदी सरळ आहे: तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही 18-22 कॅरेट सोन्याचे दागिने गहाण ठेवू शकता. काही विशिष्ट सुरक्षित लोनच्या विरुद्ध गोल्ड लोनचा वापर करण्यासाठी काही अटी किंवा मर्यादा नाहीत, त्यामुळे ते नियोजित किंवा अनपेक्षित खर्च भागवण्यासाठी आदर्श पर्याय ठरते. बजाज फायनान्स गोल्ड लोनद्वारे तुम्ही रु. 5000 पासून ते रु. 2 कोटींपर्यंतचे लोन फक्त 9.50% प्रती वर्षाने सुरु होणार्‍या व्याजदराने घेऊ शकता.

गोल्ड लोन घेताना सर्वोत्तम गोल्ड लोन व्याज दर (gold loan interest rate) घेणे महत्त्वाचे ठरते कारण त्यामुळे किफायतशीरतेची सुनिश्चिती होते आणि तुमचा एकूण कर्ज-खर्च कमी होतो. तुमचा परतफेडीच्या प्रवासाला आकार देण्यात तुम्ही स्वीकारत असलेला व्याजदर महत्त्वाची भूमिका पार पाडतो. गोल्ड लोन व्याजदर गोल्ड लोनला कसा आकार देतो हे समजून घेण्यासाठी पुढे वाचा.

गोल्ड लोन व्याजदरावर परिणाम करणारे घटक

गोल्ड लोन व्याजदर हा कर्जाची एकूण किंमत ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे. कर्ज घेतलेल्या रकमेवर या दराने व्याज जमा होते आणि कर्ज परवडण्यावर आणि त्याच्या आकर्षकतेवर याचा लक्षणीय परिणाम होऊ शकतो. उच्च व्याजदर म्हणजे तुम्ही कर्जाच्या कालावधीत जास्त पैसे भरण्यास जबाबदार आहात, त्यामुळे कर्ज अधिक महाग होते. दुसरीकडे, कमी व्याजदरामुळे कर्ज घेण्याची किंमत कमी होते आणि अल्पावधी तरतला (रोकड रुपांतरित करण्याच्या गरजेसाठी) गरजांसाठी गोल्ड लोन हा एक आकर्षक पर्याय होऊ शकतो.

गोल्ड लोनवरील व्याजदरांवर परिणाम करणारे काही घटक पुढीलप्रमाणे :

बजारपेठ परिस्थिती : अलीकडील बाजारपेठेच्या कलावर लक्ष ठेवा, कारण आर्थिक घटक, महागाईचे दर आणि सोन्याची वर्तमान मागणी व पुरवठा यांचा गोल्ड लोन व्याजदरांवर परिणाम होतो. याद्वारे तुम्हाला सामान्य व्याजदर वातावरणाची कल्पना येऊ शकते.

लोन-टू-व्हॅल्यू (एलटीव्ही) गुणोत्तर: कर्जदात्यांसाठी, ते प्रदान करू शकणार्‍या जास्तीत जास्त कर्जाची रक्कम ठरवण्यासाठी एलटीव्ही गुणोत्तर एक प्रमुख घटक आहे, जे तुम्ही तारण म्हणून वापरत असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या मूल्यावर आधारित आहे. बजाज फायनान्सकडून तुम्ही, तुमच्या 18-22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या बाजारपेठ मूल्याच्या 75% पर्यंतची कर्ज रक्कम प्राप्त करू शकता.

कर्ज कालावधी: कर्जाच्या कालावधीचाही तुमच्या गोल्ड लोनवरील व्याजदरावर परिणाम होतो. जास्त कर्ज कालावधी असल्यास अल्प कालावधीच्या तुलनेत जास्त व्याजदर लागू होऊ शकतो. व्याजदरावरील प्रभावाचा विचार करताना, तुमच्या परतफेड क्षमतेशी जुळणारा गोल्ड लोन कालावधी निवडणे फार महत्त्वाचे आहे.

गोल्ड लोन व्याजदर व्यवस्थापित करण्याची धोरणे

गोल्ड लोन व्याजदरांचे प्रभाव व्यवस्थापित आणि कमी करण्यासाठी अनेक धोरणे आहेत :

संशोधन करा आणि तुलना करा: कर्जदाता निश्चित करण्यापूर्वी, विविध वित्तीय संस्था देऊ करत असलेल्या व्याजदरांबाबत संशोधन आणि तुलना करण महत्त्वाचे आहे. बाजारपेठेत सगळ्यात जास्त स्पर्धात्मक गोल्ड लोन व्याजदर देऊ करणारे कर्जदाता शोधा.

योग्य कर्ज कालावधी निवडा: कर्ज कालावधी निवडताना, द्यावी लागणारी व्याजाची रक्कम कमी करत तुम्हाला सुलभतेने कर्जाची परतफेड करता येईल असा कालावधी निवडा. अल्प कालावधीसाठी सामान्यपणे कमी व्याजदर भरावा लागतो आणि त्यामुळे व्याज शुल्कावर बचत होण्यास हातभार लागतो.

अचूकता आणि पारदर्शकता: तुमची ऑनलाईन गोल्ड लोन मंजुरी प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून, तुम्ही तारण म्हणून वापरणार असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या वजनाचे अचूक मूल्यांकन करणे गरजेच आहे. पारदर्शक मूल्यांकन प्रक्रिया उपलब्ध करुन देनार्‍या कर्जदात्याची निवड करा. उदाहरणार्थ बजाज फिनसर्व्ह, तुमच्या गोल्डसाठी जास्तीत जास्त मूल्य मिळण्याची सुनिश्चिती करण्यासाठी प्रगत कॅरेट मीटर्सचा वापर करते.

गोल्ड लोन्स मौल्यवान आर्थिक साधन आहेत, जे तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात त्वरित रोख रक्कम उपलब्ध करुन देतात. मात्र, गोल्ड लोनच्या व्याजदराचा कर्जाची किंमत आणि व्यवहार्यता यावर लक्षणीय परिणाम होतो. व्याजदरांवर परिणाम करणारे घटक समजून घेऊन आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी धोरणांचा अवलंब करुन तुम्ही तुमचे आर्थिक आरोग्य अनुकूल करणारे माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता.

बजाज फिनसर्व्ह गोल्ड लोनने तुम्ही तुमच्या पडून राहिलेल्या गोल्ड साठ्याचा जास्तीत जास्त उपयोग करू शकता. अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या बजाज फिनसर्व्ह शाखेला आजच भेट द्या किंवा बजाज फिनसर्व्ह अ‍ॅप आजच डाऊनलोड करा!

This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.

Published at : 21 May 2024 02:30 PM (IST) Tags: gold Gold loan

आणखी महत्वाच्या बातम्या

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

नोकरी करता करता 'या' मार्गाचा अवलंब करा, पगारापेक्षा जास्त पैसे मिळवा, सविस्तर माहिती एका क्लिकवर

नोकरी करता करता 'या' मार्गाचा अवलंब करा, पगारापेक्षा जास्त पैसे मिळवा, सविस्तर माहिती एका क्लिकवर

टॉप न्यूज़

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली

Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!

Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!

पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल

पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल