(Source: ECI/ABP News/ABP Majha)
7th Pay Commission: नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना बसणार जोरदार झटका, महागाई भत्त्यात कमी वाढ होणार? वाचा
7th pay commission : केंद्रीय निवृत्ती वेतनधारकांसमोरील आव्हाने ओळखून ८० आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन देण्यात येते.
7th pay commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक बातमी. नव्या वर्षात म्हणजे जानेवारी २०२५ मध्ये त्यांना मोठा धक्का बसू शकतो. महागाई भत्त्यात आजपर्यंतची सर्वात कमी वाढ दिसण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात यावेळी गेल्या तीन वर्षांच्या काळातली सर्वात कमी वाढ होऊ शकते. केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी ACIPI च्या निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेते. सप्टेंबर २०२४च्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ ते ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए म्हणजेच महागाई भत्ता ५४.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महागाई भत्ता किती मिळणार याची आकडेवारी अजून यायची आहे.
केंद्रीय निवृत्ती वेतनधारकांसमोरील आव्हाने ओळखून ८० आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन देण्यात येते.
नव्या वर्षांत बसणार धक्का?
लेबर ब्यूरोनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२४ पर्यंत AICPI निर्देशांक १४३.३ वर आहे. त्यानुसार सप्टेंबरपर्यंतचा महागाई भत्ता ५४.४९ टक्के झाला आहे.ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या आकडे येण्यास यावेळी विलंब झाला असून सध्याच्या ट्रेंडनुसार, जानेवारी २०२५ मध्ये महागाई भत्ता केवळ ३ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
महागाई भत्त्याचा नवा कल काय?
सध्याचा कल पाहता ऑक्टोबरचा डीए निर्देशांक १४३.६ पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५४.९६ टक्क्यांवर पोहोचेल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सहाव्या आणि ७ व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना वाढ मिळाली होती. काय असेल महागाई भत्त्याचा नवा आकडा?
जुलै 2024 पर्यंत DA: 53%
जानेवारी 2025 मध्ये अपेक्षित DA: 56%
कर्मचाऱ्यांना 3 टक्क्यांवर मानावे लागणार समाधान
डिसेंबर 2024 पर्यंत, निर्देशांकात 144.6 अंकांचा कल दिसतोय. अशा परिस्थितीत, महागाई भत्ता 55.91% राहण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा केवळ ३ टक्क्यांवरच समाधान मानावे लागणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांच्या आशांना धक्का बसू शकतो.